शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मांजरीचे पिल्लू आणण्यासाठी गेलेल्या मुलीला सात तास ठेवले डांबून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:17 IST

मांजरीचे पिल्लू आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला तब्बल सात तास डांबून ठेवून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : मांजरीचे पिल्लू आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला तब्बल सात तास डांबून ठेवून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. असे कृत्य करणाऱ्या एकाला लोणी-काळभोर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

      लक्ष्मण मरीबा भुरे (रा. उरूळी देवाची, ता. हवेली जि. पुणे मुळ रा. चाकुर ता. दगलुर) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत आठवीत शिकणाऱ्या १६ वर्षाच्या  मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलगी मांजरीचे पिल्लू आणण्यासाठी गेली असताना आरोपीने तिला ओढून जबरदस्तीने घरात नेले. तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करताच तिने विरोध केल्यानंतर भुरे याने तिचे हातपाय ओढणीने बांधले. तसेच तिचे तोंडही बांधले. त्यानंतर पिडीत मुलीच्या घरच्यांनी भुरेच्या घराचा दरवाजा वाजविल्यानंतर भुरेने पिडीत मुलीला ओरडू नको अशी धमकी दिली. परंतु, भुरेबद्दल संशय अधिक बळावल्याने दरवाजा उघडल्यानंतर भुरेने केलेला सर्व प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसLoni Kalbhorलोणी काळभोर