शेलपिंपळगाव : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीच्या १९० व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी सज्ज झाली आहे. शनिवारी (दि. १३) सायंकाळी चारच्या सुमारास शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून तसेच पन्नास लोकांच्या उपस्थितीत माऊलींच्या चांदीच्या चल पादुकांचे प्रस्थान होणार आहे. तत्पूर्वी माऊलींचे मंदिर, भक्त निवास व परिसराचे निजंर्तुकीकरण करण्यात आले आहे. प्रस्थान सोहळ्याला परवानगीशिवाय मंदिरात कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसून सुरक्षेच्या कारणास्तव शहरात सुमारे शंभराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माऊलींच्या पादुकांचे प्रस्थान सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ वद्य अष्टमीला अर्थातच शनिवारी (दि.१३) पहाटे चार ते साडेपाच वाजता माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व आरती होईल. दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवद्य दाखविला जाईल. नंतर दुपारी चारला प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात होईल. मोजक्या ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख केला जाईल. त्यानंतर माउलींची व गुरू हैबतबाबांची आरती होईल.
आषाढी वारी : माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी संबंधित ५० व्यक्तींनाच दिला जाणार प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 18:10 IST
तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चल पादुकांचे उद्या प्रस्थान ; पोलीस बंदोबस्त तैनात
आषाढी वारी : माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी संबंधित ५० व्यक्तींनाच दिला जाणार प्रवेश
ठळक मुद्देशनिवारी पहाटे चार ते साडेपाच वाजता माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक व आरती एकूण सतरा दिवसांसाठी आजोळघरातच माऊली मुक्कामी असणारयाठिकाणी अवघ्या पाच लोकांच्या उपस्थितीत सतरा दिवस कीर्तन आणि जागरचा कार्यक्रम