शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

Ashadhi Wari: 'येळकोट येळकोट, जय मल्हार', जयघोषात माऊलींचे जेजुरीत आगमन; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:58 IST

सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात आणि भांडाऱ्याच्या उधळणीत माऊलींचे जेजुरीत स्वागत करण्यात आले...

- बी.एम.काळे 

जेजुरी (पुणे):  "पंढरीत आहे रखुमाई, येथे म्हाळसा बानाई ।तेथे विटेवरी उभा, ईथे घोड्यावरी शोभा ।तेथे पुंडलीकनिधान, इथे हेगडी प्रधान । तेथे बुक्क्याचे रे लेणे, इथे भंडार भूषणे । तेथे वाहे चंद्रभागा, इथे जटी वाहे गंगा । तेथे मृदंग वीणा टाळ, इथे वाघ्या मुरुळीचा घोळ ।" अशा लोकप्रिय ओव्या गात आणि टाळ मृदंगाच्या गजरात श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा वैष्णव मेळा सायंकाळी ५ वाजता जेजुरीत दाखल झाला. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात आणि भांडाऱ्याच्या उधळणीत माऊलींचे जेजुरीत स्वागत करण्यात आले. ६ वाजता समाज आरतीने दमला भागला वैष्णव सोहळा जेजुरीत शिव चरणी विसावला. 

आज सकाळी श्री संत सोपान काकांच्या सासवड नगरीचा निरोप घेऊन माऊलींच्या सोहळ्याने कुलदैवत खंडेरायाच्या तीर्थक्षेत्र जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. सकाळी सकाळी संपूर्ण ढगांनी आच्छादलेले आकाश वातावरण आल्हाददायक बनवत होते. मात्र जसजसा सूर्यदेव वरवर येऊ लागला तसतसा उन्हाचा तडाखा सुरू झाला. अधुनमधून एखादं दुसरा ढग सोहळ्यावर सावली धरू पाहत होताच. ऊन सावलीचा खेळ, आणि रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता सोहळा जेजुरीकडे मार्गक्रमण करीत होता. 

माऊलींच्या रथापुढील आणि मागील दिंड्या दिंड्यातून येणारे अभंग, भूपाळ्या, गौळणी, आंधळे पांगळे गुरुपरंपरेचे अभंग, वासुदेव, नाटाचे अभंग आदींच्या मंगलमय सुरांनी संपूर्ण वातावरण चैतन्य आणि उत्साहाने भरून गेले होते. डोक्यावर रणरणत्या सुर्य किरणांची दाहकता या वातावरणाने संपूर्ण नष्टच करून टाकली होती. याच सुर ताल आणि उत्साही वातावरणात सोहळ्यातील अवघा वैष्णव मेळा झप झप पावले टाकीत मल्हारी मार्तंडांची जेजुरी जवळ करीत होता.

ग्यानबा तुकारामच्या गजरात सोहळा जेजुरीकडे येत असताना बोरावके मळा येथील न्याहारी आणि शिवरी येथील विश्रांती त्याच बरोबर साकुर्डे फाटा येथील अल्प विश्रांती उरकून सोहळ्याने मजल दरमजल करीत  सायंकाळी ५ वाजता तीर्थक्षेत्र जेजुरी जवळ केली. जेजुरी नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, माजी नगराध्यक्षा सौ. वीणा सोनवणे, गटनेते सचिन सोनवणे, माजी नगरसेवक अजिंक्य देशमुख, रोहिदास कुंभार, सुशील राऊत,  माजी नगरसेविका रुख्मिनी जगताप आदिंनी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी माऊलींच्या पालखीवर भांडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करण्यात आली. 

मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे, डॉ.राजेंद्र खेडेकर, विश्वास पानसे, पांडुरंग थोरवे, अभिजित देवकाते, अनिल सौन्दडे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी ही माऊलींचे स्वागत केले. दररोजच्या अबीर बुक्क्यात न्हाऊन निघणारा पालखी सोहळा आज जेजुरी मुक्कामी पिवळ्याजर्द भंडाऱ्यात न्हाऊन निघाला. नव्याने निर्माण करण्यात येत असणाऱ्या जेजुरीच्या पश्चिमेला अहिल्यादेवी होळकर तलावाकाठी मुक्काम तळावर सोहळा शिव विष्णूच्या गजरात पोहोचला. सायंकाळी  ६  वाजता समाज आरतीने सोहळा शिव चरणी विसावला. उद्या सकाळी  ६ वाजता सोहळा वाल्हेकडे प्रस्थान ठेवणार असल्याचे चोपदारांनी सांगितले.

आज दिवसभर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील भाविक जेजुरीत येत होते. विष्णू अवतार पंढरीनाथाला भेटायला निघालेला वैष्णव शिव अवतार मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेऊन कुलदैवताची वारी  पूर्ण करीत होता. आज दिवसभर जेजुरी गडावर ही भाविकांची मोठी गर्दी होती. वृद्ध वारकरी भाविकांसाठी मार्तंड देव संस्थानकडून पालखी मार्गावरील मुख्य शिवाजी चौकात मोठ्या स्क्रीन वर गडातील मुख्य गाभाऱ्याचे थेट प्रक्षेपण करून दर्शनाची सोय केली होती. त्याच बरोबर देवाच्या प्रसाद वाटप ही करण्यात येत होते. सासवड ते जेजुरी दरम्यान वारीच्या वाटेवर ठिकठिकाणी वारकऱ्यांना खाऊ वाटप करण्यात येत होते. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून माऊली भक्तांना आरोग्य सुविधा ही पुरवण्यात येत होत्या. व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने वारकऱ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत होते तर स्थानिक विविध राजकीय पक्ष कार्यकर्त्या कडून वारकऱ्यांना खाऊचे वाटप करण्यात येत होते.

टॅग्स :sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीJejuriजेजुरी