शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

बैलजोडी ऐवजी हाताने पालखीरथ ओढणारा महाराष्ट्रातील एकमेव पालखी सोहळा; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:23 IST

गेली १६ वर्षापासून ही परंपरा भाविकांनी जोपासली आहे...

-प्रकाश शेलार

केडगाव (पुणे) : पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ३०० पेक्षा जास्त दिंडी सोहळे निघाले आहेत. प्रत्येक पालखी रथासाठी खास खिल्लारी बैल जोडी खरेदी केली जाते. परंतु कोळगाव डोळस तालुका दौंड येथील संत श्रीपाद बाबा व रामदास बाबा पालखी रथ ओढण्याचे काम हे भाविक भक्तिभावाने करत असतात. गेली १६ वर्षापासून ही परंपरा भाविकांनी जोपासली आहे. यासाठी आनंदगड संस्थांनी आवर्जून छोटा रथ बनवला आहे.

अंदाजे ५०० किलो वजनाचा भाविक आळीपाळीने पंढरीच्या वारीकडे नेत असतात. भाविकांनी पालखी रथ ओढण्याचा हा महाराष्ट्रातील एकमेव सोहळा आहे. दिवसभर वीस ते पंचवीस किलोमीटर पल्ल्याचे अंतर भाविक आळीपाळीने सहभागी होऊन पालखी रथ ओढतात. विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असतो. आज सोहळा सायंकाळी पडवी ( ता.दौंड ) येथे मुक्कामासाठी विसावला. पालखी सोहळ्याचे काल कोळगाव डोळस ( ता.शिरूर ) येथून प्रस्थान झाले होते. राजाराम महाराज जगताप व विद्याताई जगताप यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी आलेगावचे सरपंच आप्पासाहेब बेनके उद्योजक राहुल करपे, ठेकेदार दत्तात्रय शेलार, राधिका जगताप, गुरुदास जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांना संस्थांच्या वतीने मोफत साड्या वाटप करण्यात आले.

सोहळ्याचे हे १७ वे वर्ष आहे. कीर्तनकार राजाराम महाराज जगताप व विद्याताई जगताप हे सोहळा प्रमुख आहेत. कोळगाव येथील आनंदगड वारकरी शिक्षण संस्थेतील १७ विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. सोहळ्यात वैद्यकीय सुविधा व फिल्टरचे पाणी वारक-यांना दिले जाते. १३ दिवसांनंतर आषाढी एकादशीला सोहळा पंढरपुरात पोहचणार आहे. सोहळ्यात रोज हरिपाठ, प्रवचन व कीर्तन होत असते. पडवीत सोमवारी रात्री प्रतापमहाराज चव्हाण यांचे कीर्तन झाले. सोहळ्यात जे कीर्तनकार चालतात त्यांचीच कीर्तने होतात. सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करीत आहे. 

टॅग्स :PuneपुणेAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूर