शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari : माऊलींचे जेजुरीत भंडार्‍याच्या उधळणीत स्वागत; माऊली भक्तांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:44 IST

जेजुरीकरांनी व जेजुरी नगरपालिका, मार्तंड देवसंस्थान यांच्यावतीने भंडार्‍याची उधळण करीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडार खोबर्‍याच्या उधळण करीत गडकोटात येळकोट येळकोट जय मल्हार, आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात दर्शन घेतले.

- बी.एम. काळेजेजुरी - ‘जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा..पोटा येतां हरले पापा, ज्ञानदेवा मायबापा.. या तुकारामांच्या ओवीच्या सुरात दिंडीकरी वैष्णव आज कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाच्या नगरीत सायंकाळी ५.३० वाजता पोहोचले. जेजुरीकरांनी व जेजुरी नगरपालिका, मार्तंड देवसंस्थान यांच्यावतीने भंडार्‍याची उधळण करीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडार खोबर्‍याच्या उधळण करीत गडकोटात येळकोट येळकोट जय मल्हार, आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात दर्शन घेतले.

आज सकाळी श्री संत सोपानकाकांच्या सासवड नगरीचा निरोप घेऊन सोहळ्याने कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजूरीकडे प्रस्थान ठेवले. संपूर्ण ढगांनी आछादलेले आभाळ,आल्हाददायक वातावरण आणि पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, अंगावर पर्जन्यवृष्टी घेत दिंडी दिंडीतून येणारे अभंग, भूपाळी, वासुदेव, गौळणी, आंधळे, पांगळे, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग आदींचे सुर संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि उत्साह निर्माण करीत होते. या उत्साही वातावरणात सोहळ्यातील वैष्णव झप झप पावले टाकीत खंडोबाची जेजुरी जवळ करीत होता. ज्ञानोबा माऊलींच्या गजरात सोहळा जेजुरीकडे येत असताना बोरवके मळा येथील न्याहारी उरकून शिवरी येथे दुपारच्या विश्रांती साठी निघाला. यावेळी वरुणराजाने विश्रांती घेतली होती. पुढे,  शिवरी येथील दुपारची विश्रांती त्याच बरोबर साकुर्डे येथील विसावा उरकून सायंकाळी पाच वाजता मजल दर मजल करीत सोहळा जेजुरीत पोहोचला.जेजुरीत पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आदींनी माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी सदानंदाच्या जयघोषात माउलींच्या रथावर भंडार्‍याची मुक्त हस्ताने उधळण करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी माऊलींचे स्वागत करण्यात येत होते. मार्तंड देवसंस्थान च्यावतीने ही प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, अड विश्वास पाणसे, अनिल सौन्दडे, पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर  यांनी भंडार्‍याच्या उधळणीत माऊलीचे स्वागत केले.  दररोज अबीरबुक्यात न्हाऊन निघणारा सोहळा जेजूरीत पिवळ्या जर्द भंडार्‍यात न्हाऊन निघाला

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Indian Festivalsभारतीय उत्सव-सण