शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025 : पिढ्यानपिढ्या तुळशीमाळ तयार करणाऱ्या गोणेकर कुटुंबाची विठ्ठलभक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:24 IST

गोणेकर कुटुंब मागील अनेक पिढ्यांपासून विठोबाच्या सेवेसाठी तुळशीच्या माळा तयार करण्याचे पारंपरिक कार्य करत आले आहे. हे काम त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून कधीही केले नाही, तर ते सेवा, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक मानले आहे.

पुणे : तुळशी माळ गळा काशे पितांबर या अभंगाप्रमाणे वारकरी आषाढी वारीनिमित्त लाखो भक्तांची पावले दरवर्षी पंढरपूरकडे वळतात. वारकऱ्यांच्या गळ्यात असलेली तुळशीची माळ पिढ्यानपिढ्या तयार करणारे पंढरपूरचे राजू जनार्दन गोणेकर. तुळशी माळ व्यापारासाठी नाही तर तुळशी माळेच्या पवित्र सेवेसाठी साकारत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.गोणेकर कुटुंब मागील अनेक पिढ्यांपासून विठोबाच्या सेवेसाठी तुळशीच्या माळा तयार करण्याचे पारंपरिक कार्य करत आले आहे. हे काम त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून कधीही केले नाही, तर ते सेवा, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक मानले आहे.

आजच्या भांडवली युगातही या कुटुंबाने ना नफा, ना तोटा या तत्त्वावर कार्य करत श्रद्धेचा आदर्श उभा केला आहे. राजू गोणेकर सांगतात, ‘तुळशी ही पवित्र वनस्पती आहे. तिच्या प्रत्येक माळेवर विठोबाचं नाव घेतलं जातं, आणि ती माळ जर आमच्या हातून बनली, तर ती विठोबाचीच कृपा आहे.

आषाढी एकादशी, कार्तिकी, चातुर्मासात मागणी वाढते :

विशेषतः आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या काळात विठ्ठलभक्तांकडून माळांची मागणी मोठ्या प्रमाणात येते. पण गोणेकर कधीही किंमत वाढवत नाहीत. जे काही थोडंफार स्वखर्च वसूल होतो, तोच स्वीकारतात. 

श्रद्धेचा वारसा – आधुनिक काळातही टिकवलेली भक्ती :आजच्या स्पर्धात्मक युगात जिथे प्रत्येक गोष्ट कमाईचा साधन मानली जाते, तिथे गोणेकर कुटुंबाने सेवेचा वारसा जपलेला आहे. त्यांची ही भक्ती, एकनिष्ठा आणि नि:स्वार्थ भावना विठोबाच्या सेवेला अर्पणच आहे.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सण