शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

आषाढी वारी २०२३ | श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची तारीख ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 18:04 IST

ही माहिती पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली...

देहूगाव (पुणे) :  श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान यंदा १० जूनला होणार असून हा सोहळा २८ जुनला पंढरपूरला दाखल होईल. येथे १९ दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा २९ जुन २०२३ ते ३ जुलै २०२३ या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे, पालखी अजित महाराज मोरे व विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे- जेष्ठ वद्य सप्तमी शनिवार दि. १० जूनला पालखी प्रस्थान दुपारी २ वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे.

रविवार ११ जूनला पालखी सकाळी १०.३० वाजता येथील इनामदार वाड्यातून निधुन औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. सोमवार १२ जुनला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. मंगळवार १३ जुनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल. बुधवार १४ जुन लोणीकाळभोर, गुरूवार १५ जुनला यवत,  शुक्रवार १६ जुन वरवंड, शनिवार १७ जुन उंडवडी गवळ्याची, रविवार १८ जुन बारामती, सोमवार १९ जुन सणसर, मंगळवार २० जुन आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण व मुक्काम, बुधवार २१ जुन निमगाव केतकी, गुरूवार २२ जुन इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम, शुक्रवार २३ जुन सराटी, शनिवार २४ जुन रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण आणि रात्रीचा मुक्काम अकलुज येथे होईल. रविवार २५ जुन रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल व रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. सोमवार २६ जुन रोजी सकाळी धावा व रात्री पालखी मुक्काम पिराची कुरोली येथे होईल.

मंगळवार २७ जुन रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व रात्री वाखरी येथे मुक्काम होईल. बुधवार दि.२८ जुन रोजी पालखी वाखरी वरून पंढरपूरात दाखल होतील. दुपारी उभे रिंगण होईल व त्यानंतर पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिर, नवीन इमारत येथे होईल. बुधवार २९ जुन रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान(मंदिर) येथे मुक्कामी असेल. गुरूवार दि. २९ जुन ते सोमवार दि. ३ जुलै २०२३ रोजी दुपार पर्यंत त पालखी सोहळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या (मंदिर) नवीन इमारतीमध्ये पंढरपूर येथे असणार आहे. ३ जुलैला  दुपारी काला झाल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरवात करेल. पालखी परत येताना १० दिवसांचा प्रवास करून १३ जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देहू येथे विसावेल.

असा असेल परतीचा प्रवास-

सोमवार ३ जुलै थोरल्या पादुका येथे अभंग आरती होऊन वाखरी येथे मुक्कामी राहिल. मंगळवार ४ जुलै रोजी महाळुंगे, बुधवार ५ जुलै रोजी वडापूरी, गुरूवार ६ जुलै रोजी लासुर्णे, शुक्रवार ७ जुलै रोजी बऱ्हाणपूर, शनिवार ८ जुलै रोजी हिंगणीगाडा, रविवार ९ जुलै वरवंड, सोमवार १० जुलै उऱूळी कांचन, मंगळावार ११ जुलै रोजी नवी पेठ पुणे, बुधवार १२ जुलैला पिंपरी गाव, गुरूवार १३ जुलैला देहूगाव श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या मंदिरात पालखी विसावेल.

पालखी सोहळा प्रमुख म्हणून भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरे व अजित महाराज मोरे यांची आज निवड करण्यात आली. यंदा प्रथमच व येथून पुढे कायम इंदापूर येथील शाळेतील मुक्कामाच्या ठिकाणात बदल करून हा मुक्काम आयटीआय महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्याच प्रमाणे उरुळी कांचन, भांडगाव, बऱ्हाणपूर येथील दुपारचे विसावे ग्रामस्थ जेथे जागा देतील तेथे रस्ताच्या कडेला राहतील अशी माहिती सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी दिली.

टॅग्स :Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड