शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

कारवाईचा बडगा उगारताच पीएमपीच्या रद्द फेऱ्यांत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:04 IST

-वरिष्ठ अधिकारी मार्गावर उरल्याने चालक, वाहक धास्तावले

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील बस फेऱ्या अनेक वेळा बिघाड झाल्याचे कारण सांगून अचानक रद्द केेल्या जात होत्या. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास बसची वाट पाहत थांबावे लागत होते. परंतु गेल्या एक महिन्यापासून वरिष्ठ अधिकारी आठवड्यातून दोन दिवस पीएमपीमधून प्रवास करत आहेत. त्यामुळे अचानक रद्द होणाऱ्या बस फेऱ्यांचे प्रमाण कमी झाले असून, फेऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पीएमपी प्रवाशांना दिलासा मिळत आहे.

पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडीच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. त्यातून दैनंदिन दहा लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रवास करतात. प्रवाशांच्या तुलनेत बसची संख्या कमी पीएमपी बसला प्रचंड गर्दी असते. असे असताना इंजीनमध्ये बिघाड झाला आहे. चार्जिंग संपला आहे, ब्रेक फेल झाला आहे, अशा विविध कारणे सांगून नियोजित बसफेऱ्या अचानक रद्द करत होते. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारीचे प्रमाण वाढले होते. पीएमपी अध्यक्षांनी आगार व्यवस्थापकांपासून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बस संचलन सुरळीत व्हावी, प्रवाशांची संख्या वाढवावी, यासाठी दर बुधवार आणि गुरुवारी बसमधून करण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे सर्व अधिकारी कधीही मार्गावर फिरत आहेत. त्यामुळे पीएमपी बस फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

खासगी बसचे प्रमाण जास्त  

पीएमपीच्या मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये तांत्रिक कारण सांगून बस फेऱ्या रद्द करण्याचे प्रमाण खासगी ठेकेदारांच्या बसचे जास्त होते. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना भेडसावत होते. परंतु वरिष्ठ अधिकारी स्वत: मार्गावर फिरत असल्याने संचलनातील बस देखभाल दुरुस्ती करून सोडण्यात येत आहे. शिवाय बस थांब्यावर न थांबता बस दामटणाऱ्या चालक धसका घेतल्याने बस मार्गावर सुरळीत धावत आहेत.

ब्रेक डाउनचे प्रमाण घटले  

मार्गावर सोडण्यात येणाऱ्या बस या फिटनेसविना सोडण्यात येत होते. त्यामुळे रस्त्यामध्ये दररोज ५० पेक्षा जास्त बस बंद पडत होते. आता मार्गावर बस सोडताना तांत्रिक तपासणी करून सोडण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर बस बंद पडण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे.

प्रवाशांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, बस संचलन सुरळीत व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांना मार्गावर फिरणे सक्तीचे केले आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे. शिवाय फेऱ्या रद्द होणे, ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी होत आहे. भविष्यात आणखी सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. - दीपा मुधाेळ - मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpassengerप्रवासी