शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीच्या बहाण्याने सात जणांना तब्बल ६१ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ होतीये, काळजी घ्या...

By भाग्यश्री गिलडा | Updated: April 12, 2024 16:57 IST

पुण्यातील चार वेगवेगळया घटनांमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सात जणांची तब्बल ६१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे

पुणे : मागील काही दिवसात सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ होत असून लाखाे रुपये दरवर्षी सायबर चाेरटे लंपास करत आहेत. चार वेगवेगळया घटनांमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सात जणांची तब्बल ६१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. ११) सिंहगड, लाेणीकंद आणि चंदननगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत. 

पहिल्या घटनेमध्ये, माणिकबाग भागात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ७ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२३ यादरम्यानच्या काळात सायबर चोरट्यांनी टास्क पूर्ण करून भरघोस नफा मिळवण्याचे आमिष दाखवून १ लाख ५८ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सिंहग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर करत आहेत. 

दुसऱ्या घटनेत, खराडी  रिसरात राहणाऱ्या विशाल बबन शिरसाट (वय-३२) याच्यासह इतर साथीदार राकेश रंजन, शतीश राजेंद्रन, कुणाल रंजन, काेमल ज्ञानेश्वर भाेसले यांना अनाेळखी व्यक्तीने प्रथम व्हाॅटसअपवर संर्पक साधत पार्ट टाइम जाॅब देण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर टेलीग्रामद्वारे त्यांना जाेडून घेत त्यांना विविध माेबाईल क्रमांकद्वारे संर्पक करुन त्यांना लिंक पाढवून त्यांच्या टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्यांची एकूण २२ लाख ९० हजार रुपये पाठवण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत चंदननगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाख करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील करत आहेत. 

तिसऱ्या घटनेत अरुणकुमार कृष्णकुमार (वय- ३२) या खराडी येथील तरुणाने चंदनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पार्ट टाईम जाॅब करण्या संर्दभात गुगल रिव्हयुव टास्क व क्रिप्टाेकरन्सी प्लॅटफाॅर्म संर्दभातील वेलफेअर टास्क अशाप्रकारचे टास्क पूर्ण करुन जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. टास्क पूर्ण करण्यास सांगून एकूण १३ लाख ६५ हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. तक्रारदार यांनी पैसे परत मागितले असता, आरोपींनी ३५ टक्के रक्कम नफ्यावर भरावी लागेल त्यानंतरच पैसे भेटतील नाहीतर अकाऊंट फ्रीज हाेईल असे सांगत फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत. 

लाेणीकंद परिसरात वाघाेली येथे राहणाऱ्या सचिन रघुनाथ पिसे (वय-३२) या तरुणाला अज्ञात व्यक्तीने संर्पक करुन टास्क जाॅब मध्ये माेठया प्रमाणात फायदा हाेईल असेा सांगितले. त्यात गुंतवणुक करण्यास सांगून विविध बँक खात्यात एकूण १४ लाख ९९ हजार रुपये हस्तांतरित करण्यास सांगून, काेणत्याही प्रकारचा परतावा न देता फसवणूक केली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सीमा ढाकणे करत आहेत.  

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीPoliceपोलिसMONEYपैसा