शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कलावंत हा समाजाचा सच्चा प्रवक्ता

By admin | Updated: March 8, 2015 00:57 IST

चित्र-नाट्यसृष्टीतील कलाकारांना लिहिण्याचा खूप कंटाळा आहे. खरे तर कलावंत हे त्या काळातील सामाजिक चित्र अतिशय प्रांजळपणे मांडू शकतात.

पुणे : चित्र-नाट्यसृष्टीतील कलाकारांना लिहिण्याचा खूप कंटाळा आहे. खरे तर कलावंत हे त्या काळातील सामाजिक चित्र अतिशय प्रांजळपणे मांडू शकतात. त्यामुळेच कोणताही कलावंत हा त्याकाळाचा पारदर्शक व सच्चा प्रवक्ता असतो. त्यासाठी कलावंतांनी आपले अनुभव लिहियला हवेत, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. संवाद, पुणे व मैत्रेय प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या ‘नटरंगी रंगलो’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. मैत्रेयच्या संपादिका जयश्री देसाई, सुनील महाजन, प्रकाश पायगुडे, वैभव वझे, शोभना मोघे, निकिता मोघे या वेळी उपस्थित होते. डॉ. पटेल म्हणाले, ‘‘समाज कळायला सच्चे माणूसपण असावे लागते. हे माणूसपण असलेल्याशिवाय सच्चा नट तयार होत नाही. मोघे हे सच्चे नट आहेत. ते त्या काळातील फक्त नाटकच नाही, तर चित्रपट आणि साहित्य चळवळीचे साक्षीदार आहेत. ‘नटरंगी रंगले’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्या संपूर्ण काळाचा आलेख मांडला आहे. यामध्ये फक्त त्यांनी नाटकात केलेल्या भूमिकांची माहिती नाही, तर त्यामागील प्रत्येक घटनेचा सुरेख आढावा घेतला आहे.’’(प्रतिनिधी)रुग्णसेवेसाठी अभिनय सोडलारुग्णसेवेसाठी अभिनय सोडल्याचे सांगताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘‘त्या वेळी मी नुकतीच प्रॅक्टीस सुरू केली होती. नाटकाचे प्रयोग शनिवार-रविवारीच असतात. रविवारी दौंडचा बाजार असायचा त्यामुळे त्या भागातील लोक दवाखान्यात यायचे. मी जर प्रयोगानिमित्त बाहेरगावी असलो तर रुग्णांना परत जावे लागे. त्या वेळी दळणवळणाची साधनेही फारशी नव्हती. आपल्या अभिनयामुळे रुग्णांना त्रास नको म्हणून मी अभिनय बंद करून फक्त दिग्दर्शनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. कारण, दिग्दर्शकाला प्रयोगासाठी बहेरगावी जावे लागायचे नाही. नंतर सिनेमातही अभिनयाचा मोह टाळला.’’