शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ऐतिहसिक कलाकृतींना नऊवारीची झालर ; मराठमोळी संस्कृती पोहोचवली जगभर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 19:35 IST

पैशांच्या जोरावर प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडले तरी ते कायमस्वरूपी टिकतेचं असे नाही. मात्र कलेच्या जोरावर सच्चा कलाकारासाठी याच सर्व गोष्टी हात जोडून उभ्या राहतात. याचेच चालते बोलते उदाहरण म्हणजे आशा मालपेकर. 

पुणे : पैशांच्या जोरावर प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडले तरी ते कायमस्वरूपी टिकतेचं असे नाही. मात्र कलेच्या जोरावर सच्चा कलाकारासाठी याच सर्व गोष्टी हात जोडून उभ्या राहतात. याचेच चालते बोलते उदाहरण म्हणजे आशा मालपेकर. खरं तर त्याचं नावही अनेकांना माहिती नाही, मात्र त्यांचा सिंहाचा वाटा असलेले बाजीराव-मस्तानी, पद्मावत, राजा शिवछत्रपती, मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी चित्रपट सर्वांना माहिती आहेत. त्यांचं कामही आपण सगळ्यांनी बघितलं आहे मात्र ते त्यांचं आहे हे कोणालाही माहिती नाही. 

       कारण आशा मालपेकर या स्पेशालिस्ट आहेत त्या साड्या नेसवण्यात. आयुष्यभर नृत्यांगना म्हणून नाटकात आणि निवडक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मालपेकर  यांना संपूर्ण मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी  'आऊ' म्हणून ओळखले जाते. सुबोध भावे अभिनीत बालगंधर्व चित्रपटात त्यांनीच भावे यांना पैठणी नेसवली होती. तब्बल २७ मीटर लांब असणारी ही साडी नेसवण्यास त्यांना दीड तास लागायचा. नितीन देसाई यांच्या राजा शिवछत्रपती मालिकेपासून तयार झालेला त्यांचा हा प्रवास आता हिंदीतही पसरला आहे. दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर, कंगना रानौत अशा अनेक अभिनेत्रींना त्यांनी ऐतिहासिक भूमिकांसाठी साड्या नेसवल्या आहेत. साडी कितीही मोठी असो ती चापून बसते आणि नेसणाऱ्याला सहजपणे वावरता येते हीच त्यांची वैशिष्ट्ये. त्यांनी नेसवलेल्या साड्यांमध्ये या अभिनेत्री नुसत्या वावरल्या नाहीत तर 'पिंगा' घालून नाचल्याचेही आपण बघितले आहे. गंमत म्हणजे याकरिता त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. फक्त एकदा फोटो बघून त्या तश्शीच साडी नेसवतात तीही काही मिनिटात. 

     या सगळ्या  प्रवासाबद्दल त्या सांगतात, 'मी गेले अनेक वर्ष रंगभूमीवर वावरले. इथे माझ्या कलेला सन्मान आहे याचा आनंद आहे. इतक्या मराठी आणि हिंदी कलाकारांसोबत काम केलं पण प्रत्येकाने सन्मान दिला, आदर केला इतकंच नाही तर 'आऊ' म्हणत प्रेम दिल याचा आनंद आहे. साडी नेसवणं नक्कीच सोपं नाही पण परमेश्वराच्या देणगीमुळे जमतंय मला. आज भूमिकांवर, कपड्यांवर, साडीच्या ठेवणीवर प्रचंड विचार केला जातो आणि त्यात मला काम करता येत याच समाधान आहे. आज माझं वय ८० पेक्षा अधिक आहे. अजून अनेकांना कलाकारांसोबत काम करायचं आहे. कलाकाराचा प्रवास अविरतपणे सुरु असतो, ज्या दिवशी तो स्थिरावतो त्या दिवशी कला लयास लागते. त्यामुळेच सदाबहार 'आशा मालपेकर उर्फ आऊ'     यांना आपला प्रवास पुढे सुरूच ठेवण्याची इच्छा आहे.

आशा मालपेकर यांच्या कामातील काही महत्वाचे टप्पे : 

  • बालगंधर्व भूमिकेसाठी भावे यांच्या साडीला यायच्या ५० निऱ्या, साडी नेसवण्यास लागायचा दीड  तास 
  • बाजीराव मस्तानी चित्रपटातील प्रियांका चोप्रा यांची साडी १२ मीटर लांब, पारदर्शी कापडाची साडी नेसवण्याचे आव्हान लीलया पेलले. 
  • शिल्पा शेट्टी, रणवीर सिंग (बाजीराव ) यांच्यासाठीही केले काम. 
  • नुकत्याच सोनाली कुलकर्णी अभिनीत हिरकणी चित्रपटासाठी केले काम. 
  • मनकर्णिका चित्रपटासाठी कंगना रानौत हिला भरजरी आणि भरगच्च साड्या नेसवल्या. त्यात तिचे काही लढाईचे प्रसंग असल्यामुळे साडी अजिबात सरकणार नाही अशी पद्धत वापरली. 
टॅग्स :cultureसांस्कृतिकartकलाDeepika Padukoneदीपिका पादुकोणKangana Ranautकंगना राणौतShraddha Kapoorश्रद्धा कपूर