ओतूर बाजारात कांदा पिशव्यांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:12 IST2021-09-27T04:12:01+5:302021-09-27T04:12:01+5:30
ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात रविवारी ३६ हजार ७३६ कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार नं. १ ...

ओतूर बाजारात कांदा पिशव्यांची आवक वाढली
ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात रविवारी ३६ हजार ७३६ कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार नं. १ गोळा कांद्यास १० किलोस २०० ते २३५ रुपये बाजारभाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या भावात प्रतवारीनुसार १० किलोमागे सरासरी २० रुपयांची घसरण झाली आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
रविवारी मिळालेले प्रतवारीनुसार १० किलोचे भाव :
कांदा नं१- गोळा -२०० ते २३५ रुपये. सुपर कांदा- १६० ते २२५ रुपये. कांदा नं २ गोल्टा - १०० ते १६० रुपये. कांदा नं ३ गोलटी / बदला- ५० ते १३० रुपये.
बटाटा बाजार
रविवारी फक्त ४४ बटाटा पिशव्यांंची आवक झाली. प्रतवारीनुसार १० किलोस ५० रुपये ते १३५ रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती ओतूर मार्केटचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.