ओतूर उपबाजार आवारात१२ हजार ३३० कांदा पिशव्यांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:09 IST2021-03-27T04:09:41+5:302021-03-27T04:09:41+5:30

ओतूर: जुन्नर कृषीउत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी बाजारच्या निमित्ताने १२ हजार ३३० कांदा ...

Arrival of 12 thousand 330 onion bags in Ootur sub-market premises | ओतूर उपबाजार आवारात१२ हजार ३३० कांदा पिशव्यांची आवक

ओतूर उपबाजार आवारात१२ हजार ३३० कांदा पिशव्यांची आवक

ओतूर: जुन्नर कृषीउत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी बाजारच्या निमित्ताने १२ हजार ३३० कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार कांदा नं१ ( गोळा ) १० किलोस १३० रुपये ते १५६ रुपये बाजारभाव मिळाला अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली .

गुरुवारी प्रतवारीनुसार १० किलोचे भाव :कांदा नं १--( गोळा ) १३० रुपये ते१५६ रुपये . सुपर कांदा --१०० रुपये ते१३० रुपये .कांदा नं २--(कवचट ) -८० रुपये ते १०० रुपये .कांदा नं -३-(गोल्टा ) ६० रुपये ते ८० रुपये

कांदा नं.४--(गोल्टी /बदला ) २० रुपये ते ६० रुपये .

बटाटा बाजारभाव:

गुरुवारी ३८० बटाटा पिशव्यांची आवक झाली .प्रतवारीनुसार १० किलोस ३० रुपये ते १४० रुपये.

ओतूर उपबाजार आवारात फक्त १३ लसूण पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार १० किलोस २०० रुपये ते४५१ रुपये बाजारभाव मिळाला अशी माहिती कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.

Web Title: Arrival of 12 thousand 330 onion bags in Ootur sub-market premises