विद्युत जनित्रांच्या सुट्या भागांची चोरी करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:41+5:302021-03-09T04:12:41+5:30
दोरगेवाडी येथील वैष्णव इलेक्ट्रिकल कंपनीमधून चोरांनी जुन्या तांब्याच्या तारा, नवीन तांब्याच्या तारा , नवीन तांब्याच्या पट्ट्या असा १२ ...

विद्युत जनित्रांच्या सुट्या भागांची चोरी करणारा जेरबंद
दोरगेवाडी येथील वैष्णव इलेक्ट्रिकल कंपनीमधून चोरांनी जुन्या तांब्याच्या तारा, नवीन तांब्याच्या तारा , नवीन तांब्याच्या पट्ट्या असा १२ लाख २८८ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. यवत पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वतीने तपास सुरू होता. बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी दीपक पांडुरंग खिलारे (वय - ३१ , रा.भीमनगर , बी.जे.शिर्के कंपनीजवळ , पुणे) , दीपक काळा सुतार (वय ३१, तरोडेवस्ती पोलीस चौकीच्या पाठीमागे, पुणे) , अरविंद रोहिदास वाघमारे (वय ३० , बी.जे.शिर्के कंपनीजवळ , पुणे ) , विजय पोपट शेंडगे (वय २८ , तरोडे वस्ती पोलीस चौकीच्या पाठीमागे , पुणे) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून जीपसह चोरीला गेलेल्या माला पैकी ६१० किलो तांब्याच्या तारा व पट्टी असा एकूण ४ लाख २७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. दीपक पांडुरंग खिलारे याच्यावर यापूर्वी हडपसर व लोणी काळभोर पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पद्माराज गंपले, दशरथ बनसोडे, संतोष पंडीत, बाळासाहेब चोरामले, धीरज जाधव, पोलीस नाईक राजू मोमीन, विजय कांचन यांनी ही कारवाई केली.
फोटो ओळ :- यवत येथील वैष्णव इलेक्ट्रिकल कंपनीमधून विद्युत जनित्राच्या सुट्ट्या भागांसह सुमारे १२ लाख रुपयांचा माल चोरून नेणाऱ्या चोरांच्या टोळीला यवत पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर त्यांच्यासमवेत पोलीस अधिकारी व कर्मचारी