विद्युत डीपीमधील तांब्याच्या तारा चोरणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:21 IST2021-02-05T05:21:17+5:302021-02-05T05:21:17+5:30

वाघोली : केसनंद, भावडी, शिंदेवाडी येथील विद्युत रोहित्राचे नुकसान करून त्यातील तांब्याच्या तारा चोरी करून नेणाऱ्या दोन सराईतांना लोणीकंद ...

Arrested for stealing copper wire from electric DP | विद्युत डीपीमधील तांब्याच्या तारा चोरणारे जेरबंद

विद्युत डीपीमधील तांब्याच्या तारा चोरणारे जेरबंद

वाघोली : केसनंद, भावडी, शिंदेवाडी येथील विद्युत रोहित्राचे नुकसान करून त्यातील तांब्याच्या तारा चोरी करून नेणाऱ्या दोन सराईतांना लोणीकंद गुन्हे शोध पथकाने वाघोली येथे पकडले आहे. त्यांच्याकडून १२० किलो तांब्याच्या तारा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी येथे रस्त्याच्या कडेला असणारी विद्युत रोहित्र खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा आठ दिवसांपूर्वी दाखल केला होता. लोणीकंद डी.बी. पथक वाघोली गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना परमेश्वर चांदप्पा नडगिरे (वय २२, रा. खांदवे नगर, वाघोली), बबलू लल्लु मिया उर्फ सहा (वय २७ रा. मगरवस्ती, लोणीकंद) हे दोघेजण दुचाकीवरून संशयितरित्या प्लास्टिकचे पिशवी मध्ये सामान घेऊन जात असताना दिसले. डी. बी. पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडे विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तारा मिळून आल्या. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा माल हा भावडी, केसनंद, शिंदेवाडी या ठिकाणांहून चोरून आणले बाबत सांगितले. त्यांच्याकडे १२० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व दुचाकी असा एकूण ९० हजारांचा माल मिळून आला आहे. त्यांच्याकडून लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतील विद्युत रोहित्र चोरीचे एकूण ४ गुन्हे उघड झाले आहेत. व आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Arrested for stealing copper wire from electric DP