शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

एक्सॉर्टसाठी तरुणी पुरविणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 21:26 IST

मागणीप्रमाणे वेश्यागमनासाठी तरुणी पुरविणारा नगर रोडवरील हयात चौकात येणार असल्याची माहिती

ठळक मुद्देअधिक तपासासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर

पुणे : वेश्यागमनासाठी तरुणी पुरविण्याचे काम करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला येरवडा पोलिसांनी एका तरुणीसह अटक केली आहे़. हेमंत प्राणाबंधु शाहु (वय २८, रा़ केसनंद फाटा, मुळे ओरिसा) असे या मुख्य सुत्रधाराचे आहे़. त्याचा साथीदार छोटू ऊर्फ राजू शाहु पळून गेला़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, येरवडा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बाळासाहेब बहिरट व त्यांचे साथीदार गस्त घालत असताना ग्राहकांना मागणीप्रमाणे वेश्यागमनासाठी तरुणी पुरविणारा नगर रोडवरील हयात चौकात येणार असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी पहाटे हयात चौकात सापळा लावला़. तेव्हा चौकातील टायर दुकानाजवळ एक कार येऊन थांबली़. गाडीत दोन पुरुष व एक तरुणी होती़. पोलिसांनी दोघांना पकडले़ त्यावेळी राजू शाहु पळून गेला़. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर हेमंत शाहु हा तरुणींना जादा पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी तयार करीत असत़. ग्राहकांना त्यांचे फोटो पाठवून त्यांच्या पसंतीप्रमाणे तो तरुणींना लॉजवर स्वत: घेऊन जात असे़. ग्राहकांकडून एका रात्रीचे ६ हजार रुपये घेत असल्याचे त्याने सांगितले़. त्यांच्याकडून दोन मोबाईल, कार व पर्स असा २ लाख १ हजार ५२० रुपयांचा माल जप्त केला आहे़. न्यायालयाने अधिक तपासासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे़.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक फौजदार बाळासाहेब बहिरट, हवालदार हनुमंत जाधव, सचिन रणदिवे, समीर भोरडे, सुनिल सकट, शरद दौंड, महिला पोलीस शिपाई गजरमल यांनी केली़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसArrestअटक