शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

"देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन शरजीलला तात्काळ अटक करा", भाजपाची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 18:02 IST

Sharjeel Usmani : "शरजीलवर यापूर्वी हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. तरीही त्याला यावर्षी परिषदेत निमंत्रित करण्यात आले. त्याने अतिशय आक्षेपार्ह विधाने केली आहेत."

पुणे - एल्गार परिषदेमध्ये हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य करण्यासोबतच भारतीय संघराज्य आणि भारताची राज्य घटना मानत नसल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये देशद्रोहाचे कलम अंतर्भूत करुन त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी भाजपाच्या शिष्ठमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.  या संदर्भात शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिले. 

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार प्रदीप रावत, आमदार भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर, तक्रारदार ऍड. प्रदीप गावडे उपस्थित होते. 

माजी खासदार प्रदीप रावत म्हणाले, ‘पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद आयोजित केली होती. याचे आयोजनात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेचा हात होता. शरजीलवर यापूर्वी हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. तरीही त्याला यावर्षी परिषदेत निमंत्रित करण्यात आले. त्याने अतिशय आक्षेपार्ह विधाने केली आहेत. तसेच परिषदेच्या ठिकाणी खोटा इतिहास, जातीय तेढ निर्माण करणारी, महापुरूषांचा अवमान करणारे साहित्य असणारी पुस्तकांची विक्री करण्यात आली. याचा सखोल तपास करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.’ यावेळी पोलीस आयुक्तांनी कायदेशीर बाबी तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शरजील उस्मानीने पुण्यातील एल्गार परिषदेत केलेले वक्तव्य संतापजनक आहे. एवढे प्रक्षोभक वक्तव्य करून देखील राज्य शासन उस्मानीला पाठीशी घालत आहे. हिंदूंच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. त्याच्यावर नोंदविण्यात आलेला गुण अत्यंत साध्या पद्धतीचा आहे. जाती-धर्माचा निर्माण व्हावा हाच यामागील उद्देश आहे. राज्यघटना नाकारून त्याने भारतीय संघराज्याला आव्हान दिले आहे. त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा करावा. अन्यथा,  शहरांमध्ये सर्वत्र आंदोलन केले जाईल.

-  जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजपापुणे

तीन वर्षांपूर्वी झालेल्या एल्गार परिषदवेळी एल्गार परिषदेनंतर झालेली दंगल सर्वांना माहिती आहे. यापूर्वीचा अनुभव वाईट असताना देखील पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी कशी दिली हा प्रश्न आहे? गुन्हा दाखल करताना साधी कलमे लावण्यात आली आहेत. त्याच्यावर देशद्रोहाचे १२४ (अ) हे कलम लावावे. राज्यघटना, संघराज्य आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. या एल्गार परिषदेमध्ये महापुरुषांची बदनामी करणारे वादग्रस्त साहित्यदेखील विक्रीस ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे आयोजकांवरही कारवाई व्हायला हवी. उस्मानीला तात्काळ अटक करावी अशी मागणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे केली आहे. जर कारवाई झाली नाही तर भाजपा आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल.

- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाHinduहिंदू