कोंढव्यातील अल्पवयीनाच्या खुनातील मुख्य आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:14 IST2021-08-15T04:14:18+5:302021-08-15T04:14:18+5:30

पुणे : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून त्याचा खून करणाऱ्या टोळक्यातील खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. अभिषेक ...

Arrest of the main accused in the murder of a minor in Kondhwa | कोंढव्यातील अल्पवयीनाच्या खुनातील मुख्य आरोपींना अटक

कोंढव्यातील अल्पवयीनाच्या खुनातील मुख्य आरोपींना अटक

पुणे : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून त्याचा खून करणाऱ्या टोळक्यातील खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

अभिषेक दशरथ पवार (वय १९, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) आणि अजिय नरसिंग गरड (वय १९, रा. येवलेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पूर्ववैमनस्यातून कार्तिक अनिल जाधव (वय १७, रा. येवलेवाडी) याच्यावर गुरुवारी दुपारी साडेचार वाजता येवलेवाडी येथे कोयत्याने वार करून जबर जखमी केले होते. उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला होता.

गुन्हे शाखेच्या पथकाकडून खुनाचा समांतर तपास सुरू होता. त्यावेळी पोलीस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे यांना बातमी मिळाली होती की, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वाघोली चौकात येणार आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Arrest of the main accused in the murder of a minor in Kondhwa