संकष्टीनिमित्त चिंतामणीला फुलांची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:29+5:302021-02-05T05:06:29+5:30
देवस्थानच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच स्वच्छतागृहांची व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्याचसोबत कोरोनाचे सावट असल्याने खबरदारीच्या सर्व ...

संकष्टीनिमित्त चिंतामणीला फुलांची आरास
देवस्थानच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच स्वच्छतागृहांची व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्याचसोबत कोरोनाचे सावट असल्याने खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या. जागोजागी सॅनिटायझर स्टँड बसविण्यात आलेले होते. तसेच वेळोवेळी माईकवरून भाविकांना खबरदारीच्या सूचना दिल्या जात होत्या. दिवसभर भाविकांची गर्दी वाढतच असल्याने रविवारी थेऊर येथील व्यावसायिकांनी देखील समाधान व्यक्त केले. मागील वर्षभरापासून या व्यावसायिकांचे अतिशय नुकसान झाल्याने रविवारी भाविक मोठ्याप्रमाणात आल्या कारणाने थेऊर परिसरात आनंद पसरला होता. थेऊर ग्रामपंचायत प्रशासनाने देखील भाविकांच्या गाड्यांच्या पार्किंगची सोय केल्याने भाविकांचा मोठा मनस्ताप वाचला. त्यामुळे भाविकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले. चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदिरातील सर्व बाबींवर आनंद महाराज तांबे व व्यवस्थापक डॉ.पोफळे लक्ष ठेुा्रन होते.
चौकट
आज शासनाच्या प्लस पोलिओ मोहिमेअंतर्गत कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहबूब लकडे व डॉ. शिल्पा गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली आशा सेविका पुष्पलता गायकवाड,अनिल खवळे,बाबू जाधव यांनी मंदिर परिसरात पाचशेहून अधिक बालकांना पोलिओ डोस दिला.
फोटो ३