शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे कोंबड्यांच्या खुराड्यात तासभर ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 6:06 PM

 हांडे- देशमुख वस्ती येथील राहत्या घराजवळील कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याने प्रवेश करून २० कोंबड्या फस्त केल्या़.

निरगुडसर : हांडे-देशमुख वस्ती येथे राजेंद्र गणपत हांडे यांच्या राहत्या घराजवळील कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याने प्रवेश करून २० कोंबड्या फस्त केल्या़. त्यानंतरही तो तासभर तेथे ठाण मांडून बसल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री दोन वाजता घडली़. कोंबड्यांच्या ओरडण्याने राजेंद्र हांडे यांना जाग आली. त्यांनी खुराड्याजवळ जाऊन पाहिले असता त्यांना बिबट्या आतमध्ये असल्याचे दिसले़. त्याचवेळी बिबट्या त्यांच्यावर जोरात गुरकला़. त्यानंतर ते पळाले व शेजारील राहुल हांडे व मच्छ्रिंद्र हांडे यांना बोलावले़. त्यानंतरही बिबट्या आतमध्ये सुमारे एक तास बसून होता़. नंतर त्यांनी खुराड्याला चारही बाजुने पत्रे लावले.परंतु, तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला़. १५ मिनिटांनी तो त्या ठिकाणाहुन प्रयत्न करून बाहेर पडला व पसार झाला़.माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांनी वन विभागाशी संपर्क करून सदर घटनेची माहीती दिली़ त्यानंतर वन विभागाचे वनअधिकारी पालवे मंगेश गाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़. उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, आनंदराव वळसे, शरद वळसे, संतोष वळसे, व ग्रा़मपंचायत सदस्य सपना हांडे, जयश्री थोरात, तसेच आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल हांडे यांनी वनविभागाने या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.     

टॅग्स :ambegaonआंबेगावleopardबिबट्या