शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभाग भरतीचा पेपर मुंबईतूनच फुटला; आरोग्य संचालनालयातूनच सहसंचालकाला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 20:12 IST

मुंबईतील आरोग्य संचालयनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडूनच हा पेपर फुटल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे...

पुणे :आरोग्य विभग गट ड परिक्षेचा पेपर फुटीचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहचले असून मुंबईतील आरोग्य संचालयनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडूनच हा पेपर फुटल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी सह संचालक महेश बोटले याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लातूर येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याने आपल्याला बोटले याच्याकडून पेपर मिळाला असल्याची कबुली दिल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

आरोग्य विभागाचा ड परिक्षेचा पेपर फुटीप्रकरण सायबर पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. हा पेपर फुटीमधील एजंट, क्लासचालक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यापासून थेट प्रत्यक्ष पेपर फोडणार्यापर्यंत पोहचण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. त्यात अनेक मोठमोठे अधिकारी सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. महेश बोटले याच्याकडे पेपर सेटरांशी संपर्क साधणे, तो सुरक्षित ठेवणे, परिक्षा घेणाऱ्या कंपनीशी संपर्क ठेवणे अशी जबाबदारी असल्याचे पुढे आले आहे. पेपर तयार करणार्या समितीमध्येही बोटले याचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रशांत बडगिरे याला मंगळवारी अटक केल्यानंतर सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी त्याची चौकशी केली. त्यातून या पेपरफुटीसंबंधी अनेक बाबी पुढे आल्या आहेत. त्यातूनच बडगिरे याने महेश बोटले याच्याकडून पेपर मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर आज सकाळी सायबर पोलिसांच्या पथकाने मुंबईतून बोटले याला ताब्यात घेतले. त्याच्या कार्यालय व घरझडती घेण्यात आली. आज दुपारी बोटले याला पुण्यात आणले असून त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.

बडगिरे याला मिळाले ३३ लाखबडगिरे याने आपल्याला १५ लाख मिळाल्याचे अगोदर सांगितले होते. मात्र, अधिक चौकशीत त्याने आपल्याला ३३ लाख मिळाल्याची कबुली दिली आहे. बडगिरे याने ज्यांच्याकडून पैसे घेऊन पेपर पुरविला. त्यांनी तो पुढे अनेक एजंट, क्लास चालकांना पुरवून त्यातून आतापर्यंत ८० लाख रुपये उकळल्याचे पुढे आले आहे. ही लिंक आणखी पुढे गेली असण्याची शक्यता आहे. त्यातून करोडो रुपयांची मलई खाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड