शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Arogya Bharti: आरोग्य पेपटफुटीमध्ये बीडमधून आणखी एका एजंटला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 20:58 IST

आरोग्य पेपरफुटी प्रकरणात भूम, उस्मानाबाद येथील ग्रामीण रुग्णालय सहायक अधीक्षक कार्यालयातील क्लार्क राजेंद्र सानप याला सायबर पोलिसांनी अटक केली होती...

पुणे : आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणात सायबर पोलिसांनी रविवारी बीडमधून आणखी एकाला अटक केली आहे. संजय शाहूराव सानप (वय ४०, सध्या रा. धनंजय निवास, संत ज्ञानेश्वर नगर, बीड, मुळ - वडझरी, ता. पाटोदा, बीड) असे त्याचे नाव आहे. आरोग्य पेपर फुटीमध्ये आतापर्यंत १८ जणांना अटक केली असून त्यामध्ये एकट्या बीड जिल्ह्यात हा ८ वा आरोपी आहे.

आरोग्य पेपरफुटी प्रकरणात भूम, उस्मानाबाद येथील ग्रामीण रुग्णालय सहायक अधीक्षक कार्यालयातील क्लार्क राजेंद्र सानप याला सायबर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने एजंट संजय सानप याला आरोग्य विभागाचे गट क व गट डचे पेपर पुरविल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक मीनल सुपे -पाटील व त्यांच्या सहकार्यांनी संजय सानप याला रविवारी अटक केली. त्याला सोमवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले.

सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी सांगितले की, संजय सानप याला परीक्षेपूर्वी गट ड व क या संवर्गाचा पेपर मिळाला होता. त्यांच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. त्याने हे पेपर अनेक परीक्षार्थींना दिला आहे. आरोपीने किती जणांना हा पेपर दिला. त्यांच्याकडून किती पैसे स्वीकारले, याबाबत सखोल तपास करायचा आहे. आरोपी याने कोणाच्या मदतीने व कशाच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या गट ड व क या संवर्गाचा पेपर परीक्षार्थींना दिला,याचा तपास करायचा आहे. त्याच्या घराची झडती घेऊन त्यामध्ये मिळून येणार्या पुराव्याच्या आधारे आरोपीकडे तपास करायचा असल्याने ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोग्य विभागाच्या पेपरफुटीमध्ये प्रामुख्याने मुंबईतील मुख्य सुत्रधार महेश मोटले व खलाशी प्रकाश मिसाळ हे वगळता इतर प्रामुख्याने औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा येथील आरोग्य विभागातील अधिकारी,क्लार्क, एजंट आणि क्लास चालकांचा समावेश आहे. औरंगाबाद येथील तीन क्लास चालक, एजंट तसेच जालना, बुलढाणा येथील एजंट व परीक्षार्थींचा समावेश आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpri-acपिंपरीMaharashtraमहाराष्ट्र