शहरं
Join us  
Trending Stories
1
Dombivli MIDC Explosion डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट
2
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय
3
मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण
4
रील, ४० हजार फॉलोअर्स अन् अफेअर... ५ मुलांची आई बॉयफ्रेंडसह फरार; म्हणते, नवऱ्याला कंटाळली
5
'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला
6
"राग येणं स्वाभाविक पण.."; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला चिराग पासवान यांचा सल्ला
7
Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
8
Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार? 23 जूनला होणार सेलिब्रेशन
9
सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास
10
१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान
11
पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?
12
"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम
13
Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
14
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता
15
पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम
16
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार; ३ दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला
17
लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन, म्हणाली- "हा माझा निर्णय आहे..."
18
प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग
19
९ ठार! वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; रोहितची पत्नी भावूक, म्हणाली...
20
T20 WC 2024: टीम इंडिया आज तरी चूक सुधारणार? अमेरिकेविरूद्ध 'या' खेळाडूचा पत्ता कट?

लष्करापुढे आधुनिकीकरणाचे आव्हान : मायकल मॅथ्यूज; लष्करी महाविद्यालयाचा २३७वा स्थापना दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:45 AM

लष्करी महाविद्यालयाचा २३७ वा स्थापना दिवस शुक्रवारी साजरा होत आहे. यानिमित्त विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्यूज यांनी संवाद साधला.

ठळक मुद्देविविध संसाधन, तंत्रज्ञानाच्या पुरवठ्यासाठी अभियांत्रिकी विद्यालयातील अभियंत्यांना प्रशिक्षण सीमेवरील रस्त्यांची बांधणी हे सर्वांत मोठे आव्हान : मायकल मॅथ्यूज

पुणे : आजच्या काळात लष्कराला आघाडी घेण्यासाठी विविध साधनांची गरज भासते. ती पुरविण्याची जबाबदारी ‘इंजिनिअर कोअर’ची आहे. सध्या लष्कराला लागणार्‍या  शस्त्रास्त्रांचे; तसेच साधनांचे आधुनिकीकरण, तिन्ही दलाला लागणार्‍या पायाभूत सुविधांचा विकास; तसेच सीमेवरील रस्त्यांची बांधणी हे सर्वांत मोठे आव्हान आहे, असे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्यूज यांनी सांगितले. लष्करी महाविद्यालयाचा २३७ वा स्थापना दिवस शुक्रवारी साजरा होत आहे. यानिमित्त विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, युद्धादरम्यान लष्कराला वेगवान हालचाली, तसेच अनेक अडथळे दूर करण्यासाठी विविध संसाधनांचा आणि तंत्रज्ञानाचा पुरवठा करावा लागतो. यासाठी अभियांत्रिकी विद्यालयात अभियंत्यांना प्रशिक्षित केले जाते. सद्य:स्थितीत लष्करासमोर असलेल्या आव्हानाबाबत मॅथ्यूज म्हणाले की, लष्कराकडे सध्या उपलब्ध असलेल्या साधनांचे आणि आधुनिकीकरण करणे महत्त्वाचे आहे.  आतापर्यंत फक्त३० ते ४० टक्के लष्करी आस्थापना उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काळात ही तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.  सीमावर्ती भागात सध्या मोठ्या प्रमाणात रस्ते उभारणीचे काम सुरू आहे. हे रस्ते बांधताना वातावरणाचा सर्वाधिक अडथळा येतो. केवळ चार ते पाच महिने रस्त्यांची कामे करायला मिळतात. भविष्यात या समस्या सोडविण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरू आहे. 

 

‘सीएमई’मध्ये होणार राष्ट्रीय रोइंग स्पर्धाविविध क्रीडाप्रकारांना प्रोत्साहान देण्यासाठी लष्करी महाविद्यालयात सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून जवळपास २००० हजार मीटरचा आंतरराष्ट्रीय मानांकन असलेला रोइंग चॅनल या ठिकाणी बांधण्यात आला आहे. पुढील महिन्यात या ठिकाणी राष्ट्रीय रोइंग स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे मॅथ्यूज यांनी सांगितले.

 

भूसुरुंग शोधण्याचा थरारयुद्धात लष्कराचा वेग कमी करण्यासाठी, तसेच रणगाडे उडविण्यासाठी शत्रुतर्फे भूसुरुंग; तसेच रणगाडाविरोधी स्फोटके पेरली जातात. हे भूसुरुं ग शोधण्याचे काम आव्हानात्मक असते. युद्ध; तसेच शांतता काळात ती कशी शोधली जातात  या बरोबरच वाटेत येणार्‍यां नद्या, तसेच उंच सखल डोंगर कसे पार करतात याची चित्तथरारक प्रात्यक्षिके या वेळी दाखवण्यात आली. भूसुरुंग शोधण्यासाठी; तसेच ते जमिनीत पेरण्यासाठीचे तंत्रज्ञान आणि यंत्रे अभियांत्रिकी महाविद्यालयात बनवण्यात आली आहे. रणगाड्याच्या पुढे लोखंडी चाके लावून ती भूसुरुंगावरून ती आधी नष्ट करण्यात आली. डीआरडीओतर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘आरोही’ या रोबोटद्वारे स्फोटके कशी शोधली, आणि ती कशी नष्ट केली जातात याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. नद्या; तसेच उंच सखल परिसर पार करण्यासाठी आर्मी अभियांत्रिकी महाविद्यालय; तसेच डीआरडीओतर्फे विकसित केलेले पूल कसे कार्य करतात, याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. एएम५० व भारतीय बनावटीचे ‘सर्वत्र’ हा पूल युद्धकाळात कशापद्धतीने वापरला जातो, याचेही सादरीकरण या वेळी केले.

 

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संशोधन केंद्राला मान्यतासंशोधनाला चालना देण्यासाठी लष्करी अभियांत्रिकी विद्यालयातील केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. या केंद्राला पुणे विद्यापीठाचीही मान्यता मिळाली आहे. सध्या महाविद्यालयातील २१ अधिकार्‍यांना डॉक्टरेट मिळाली असून, ते मार्गदर्शन करण्यासाठी पात्र झाले आहेत. यामुळे लष्करातील अधिकार्‍यांना पुढील संशोधन करण्यासाठी लागणार्‍या सोई-सुविधा, तसेच मार्गदर्शन विद्यालयातच मिळणे शक्य होणार आहे.

 

टॅग्स :Puneपुणे