शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

असा आहे पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प : वाचा ठळक मुद्दे 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 8:42 PM

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अंदाजपत्रकामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहे. आयुक्तांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे तब्बल ६ हजार ८५ कोटी अंदाजपत्रक गुरुवार (दि.१७) रोजी स्थायी समितीला सादर केले.

पुणे : महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अंदाजपत्रकामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहे. आयुक्तांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे तब्बल ६ हजार ८५ कोटी अंदाजपत्रक गुरुवार (दि.१७) रोजी स्थायी समितीला सादर केले. गेल्या दोन-तीन वर्षांत महापालिकेला उत्पन्नाचा चार हजार कोटीचा टप्पा गाठताना नाकीनऊ येत असताना आयुक्तांकडून  उत्पन्न वाढीसाठी कोणतेही ठोस पर्याय न देता अंदाजपत्रक चांगलेच फुगवले आहे. 

  • १० लाखा पेक्ष अधिक रक्कमेच्या सर्व कामांची सामजिक परिणाम तपासणार
  • शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंगरोड सारखे उच्च क्षमता जलद गतीमार्ग ( एच. सी. एम. टी.आर.) प्रकल्पाला गती देणार ,
  • एच.सीएमटीआर रस्त्यासाठी २११ कोटींची तरतुद
  • सन २०३० अखेर पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात ५०० ईलेक्ट्रीक व ८५० सीएनजी बस खरेदी करणे 
  • पुणे शहरामध्ये पुढील पाच वर्षात ८२४ किलो मिटरचे सायकल ट्रॅक टप्प्या-टप्प्याने विकसित करणार, अंदाजपत्रकात २४ कोटी रुपयांची तरतुद
  • शहरात प्रायोगित तत्त्ववार दिल्ली सरकारच्या धर्तीवर पाच शाळा मॉडले स्कूल विकसित करणार 
  •  सामाजिक विकास विभागा अंतर्गत शाहर अंधांसाठी आॅडियो लायब्ररी सुरु करणार
  •  शाळांमध्ये रोबोटिक्स लॅब आणि संगीत वर्ग सुरु करणार
  •   व्यवसायिक प्रशिक्षणासाठी ७ नवीन लाईट हाऊस उभारणार 
  • शहरातील महापालिकेच्या ३४ इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प
  • शिवसृष्टी प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार
  • प्रधानमंत्री आवास योजने अतंर्गत शहरात २१ हजार घरे बांधणार, घरांचे वाटप २०१९-२० मध्येच सुरु करणार 

 

समाविष्ट गावांसाठी अंदाजपत्रकात काय 

  • समाविष्ट २३ गावांचा लोकल एरिया प्लॅन करणार
  • नव्याने समाविष्ट ११ गावातील बांधकामे अधिकृत करणार
  • ११ गावांमध्ये नवीन टीपी स्कीम राबविणार
  •  समाविष्ट गावांचा ईएलयु जाहीर करणार 

आरोग्य विभागासाठी २४६.२६ कोटीची तरतुद

  • शहरात महापालिकेच्या रुग्णालयात स्वतंत्र बर्न वॉर्ड सुरु करणार 
  • आणखी ३ ठिकाणी डायलिसीस सुविधा देणार

 उद्यान विभाग ९७.१२ कोटी 

  • कोथरूड परिसरात डहाणुकर कॉलनी येथे ‘बोलणारी झाडे’ हा खास प्रकल्प
  • हिंगणे खुर्द येथे ४ एकरच्या तुकाई माता उद्यानात लिली आणि रॉक पार्क
  • वडगाव शेरी येथे दिव्यांगाकरिता अडथळा विरहीत उद्यान विकसित करणार 

वाहतुक नियोजन व प्रकल्प : २५२.०९ कोटी तरतुद 

  •  सिंहगड रस्ता धायरी फाट वाय आकाराचा जंक्शन पूल बांधणे
  • औंध सांगावी रस्त्यावर नवा आणखी एक पूल बांधणे
  • राजाराम पूल येथे आर्ट प्लाझा
  •   हडपसर आणि रामटेकडी येथे भुयारी मार्ग. बोपोडी चौकात भुयारी मार्ग
  • वडगाव शेरी येथील नवीन पार्किंग तळ विकसित करणार
  • शहरातील जुन्या १२ पुलाचे स्ट्रक्चरल आॅडीट करणार
  • शहरातील शंभर किलोमीटरचे रस्ते पाहिल्या टप्प्यात सुरक्षित करणार
  • १४०० किलोमीटर रस्त्याचे रोड असेंट मॅनेजमेंट सिस्टम नुसार रस्त्याचा बदल करणार
  • शंभर किलोमीटर रस्त्यावर स्मार्ट स्ट्रीट करणार
टॅग्स :Budgetअर्थसंकल्पPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका