तिरंदाज प्रवीण जाधव यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:09 IST2021-09-03T04:09:42+5:302021-09-03T04:09:42+5:30

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिरंदाज या खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सरडे येथील प्रवीण जाधव यांचा सत्कार मेखळी येथे आयोजित ...

Archer Praveen Jadhav felicitated | तिरंदाज प्रवीण जाधव यांचा सत्कार

तिरंदाज प्रवीण जाधव यांचा सत्कार

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिरंदाज या खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सरडे येथील प्रवीण जाधव यांचा सत्कार मेखळी येथे आयोजित केला होता. या वेळी प्रवीण जाधव यांना पाठबळ देण्यासाठी अहिल्या शिक्षण संस्था व न्यू इंग्लिश स्कूल मेखळी यांच्या वतीने पाच हजार रुपयांचा धनादेश दिला. या वेळी मार्गदर्शन करताना व आपला प्रवास सांगताना 'परिस्थितीचे भांडवल न करता आपण प्रयत्न केले तर यश नक्की मिळते' असे प्रतिपादन जाधव यांनी केले. या वेळी अहिल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संपत देवकाते, सरपंच रणजित देवकाते, मुख्याध्यापक राजेंद्र धायगुडे, रामदास शेंडगे, ज्ञानदेव येळे, सचिन जाधव, गणेश जाधव व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन शेंडगे यांनी केले.

मेखळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तिरंदाज सुभेदार प्रवीण जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

०२०९२०२१-बारामती-०६

Web Title: Archer Praveen Jadhav felicitated