शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड रस्त्याच्या पर्यायी रस्त्याला अखेर मंजुरी

By admin | Updated: August 18, 2015 03:55 IST

सर्वोच्च न्यायालयाने नदीपात्रात बनविलेला रस्ता उखडून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर कालव्याच्या बाजूने पर्यायी रस्ता तयार करण्याची जोरदार मागणी नगरसेवकांकडून

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने नदीपात्रात बनविलेला रस्ता उखडून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर कालव्याच्या बाजूने पर्यायी रस्ता तयार करण्याची जोरदार मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत होती. या रस्त्याच्या प्रस्तावास अखेर मंजुरी देऊन ४ कोटी रुपये स्थायी समितीने उपलब्ध करून दिले आहेत. वडगाव बुद्रुक ते सारसबागेजवळील सावरकर पुतळ्यापर्यंत पर्यायी रस्ता तयार करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.सिंहगड रस्त्याच्या परिसराचा गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण पडत आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून नदीपात्रातून रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा रस्ता उखडून टाकण्यात येत आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे उद्यानाच्या मागून कालव्याच्या दिशेने पर्यायी रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव सिंहगड रस्ता भागातील सर्वपक्षीय नगरसेवक विकास दांगट, श्रीकांत जगताप, मंजूषा नागपुरे, संगीता कुदळे, राजाभाऊ लायगुडे, युगंधरा चाकणकर, राहुल तुपेरे यांनी दिला होता. याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी दिली.गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पडून होता. मागील आठवड्यात स्थायी समितीने या रस्त्याच्या जागेची पाहणी केली होती. पहिल्या टप्प्यात वडगाव ते विश्रांतीनगर हा सुमारे अडीच कि. मी. रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर विश्रांतीनगर ते पु. ल. देशपांडे उद्यानपर्यंतचा दुसरा टप्पा तर पु. ल. देशपांडे उद्यान ते सारसबागेजवळील सावरकर पुतळ्यापर्यंत तिसरा टप्पा याप्रमाणे काम करण्यात येणार आहे. विश्रांतीनगरनंतर पुढील रस्ता हा खासगी व सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) करण्यात येणार आहे. मूळ प्रस्तावामध्ये वडगाव ते पु. ल. देशपांडे उद्यान यादरम्यान साडेचार किलोमीटर रस्त्याचा प्रस्ताव होता.