सिंहगड रस्त्याच्या पर्यायी रस्त्याला अखेर मंजुरी

By Admin | Updated: August 18, 2015 03:55 IST2015-08-18T03:55:00+5:302015-08-18T03:55:00+5:30

सर्वोच्च न्यायालयाने नदीपात्रात बनविलेला रस्ता उखडून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर कालव्याच्या बाजूने पर्यायी रस्ता तयार करण्याची जोरदार मागणी नगरसेवकांकडून

Approval of alternative road of Sinhagad road | सिंहगड रस्त्याच्या पर्यायी रस्त्याला अखेर मंजुरी

सिंहगड रस्त्याच्या पर्यायी रस्त्याला अखेर मंजुरी

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने नदीपात्रात बनविलेला रस्ता उखडून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर कालव्याच्या बाजूने पर्यायी रस्ता तयार करण्याची जोरदार मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत होती. या रस्त्याच्या प्रस्तावास अखेर मंजुरी देऊन ४ कोटी रुपये स्थायी समितीने उपलब्ध करून दिले आहेत. वडगाव बुद्रुक ते सारसबागेजवळील सावरकर पुतळ्यापर्यंत पर्यायी रस्ता तयार करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
सिंहगड रस्त्याच्या परिसराचा गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण पडत आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून नदीपात्रातून रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा रस्ता उखडून टाकण्यात येत आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे उद्यानाच्या मागून कालव्याच्या दिशेने पर्यायी रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव सिंहगड रस्ता भागातील सर्वपक्षीय नगरसेवक विकास दांगट, श्रीकांत जगताप, मंजूषा नागपुरे, संगीता कुदळे, राजाभाऊ लायगुडे, युगंधरा चाकणकर, राहुल तुपेरे यांनी दिला होता. याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी दिली.
गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पडून होता. मागील आठवड्यात स्थायी समितीने या रस्त्याच्या जागेची पाहणी केली होती. पहिल्या टप्प्यात वडगाव ते विश्रांतीनगर हा सुमारे अडीच कि. मी. रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर विश्रांतीनगर ते पु. ल. देशपांडे उद्यानपर्यंतचा दुसरा टप्पा तर पु. ल. देशपांडे उद्यान ते सारसबागेजवळील सावरकर पुतळ्यापर्यंत तिसरा टप्पा याप्रमाणे काम करण्यात येणार आहे. विश्रांतीनगरनंतर पुढील रस्ता हा खासगी व सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) करण्यात येणार आहे. मूळ प्रस्तावामध्ये वडगाव ते पु. ल. देशपांडे उद्यान यादरम्यान साडेचार किलोमीटर रस्त्याचा प्रस्ताव होता.

Web Title: Approval of alternative road of Sinhagad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.