पुणे : राज्याला सध्या १९ लाख ४०० घरांची आवश्यकता आहे. त्यापैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत येत्या दोन वर्षात २.३५ लाख घरे उपलब्ध होतील. पुणे जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण घरकुलांपैकी सुमारे १ लाख घरांचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे. त्यापैकी २९००० परवडणाऱ्या घरांना मंजुरी प्राप्त झाली आहे. याकरिताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गरजूंसाठी माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे, असे मत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केले. पीएमआरडीएच्या प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेला गतिमानता व पारदर्शकता प्राप्त करून देण्याकरिता नागरिकांसाठी ‘माहिती व्यवस्थापन प्रणाली’ (पोर्टल) विकसित केली आहे. मुंबई येथे आयोजित ‘परवडणार घरं परिषद महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सोमवारी प्रकाश मेहता यांच्या हस्ते या प्रणालीचे उदघाटन केले. एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, संयुक्त सचिव अमरीत अभिजात, आवास व शहरी कार्य मंत्रालय अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, मध्यप्रदेश रेराचे अध्यक्ष अनथोनी दे. सा., पीएमआरडीएचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण देवरे उपस्थित होते. सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मितीसाठी पीएमआरडीए, मार्फत १४ प्रस्ताव केंद्रीय देखभाल व परवानगी समितीने मंजुरी दिली आहे. मोक्याच्या ठिकाणी २९ हजार ७० परवडणारी घरे निर्माण होणार आहेत. या २९ हजार ७० घरांसाठी अर्ज स्वीकारण्यापासून तर घर हस्तांतरण करण्याची सर्व प्रक्रिया या प्रणालीमधून होईल, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.
पीएमआरडीएच्या २९ हजार घरांना मंजुरी : प्रकाश मेहता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 20:11 IST
पुणे जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण घरकुलांपैकी सुमारे १ लाख घरांचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे. त्यापैकी २९००० परवडणाऱ्या घरांना मंजुरी प्राप्त झाली आहे.
पीएमआरडीएच्या २९ हजार घरांना मंजुरी : प्रकाश मेहता
ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजनेसाठी स्वतंत्र पोर्टलचे मुंबईत उद्घाटनपीएमआरडीए गरजूंसाठी माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित