शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Baramati| बारामतीत 'जलजीवन मिशन'च्या दुसऱ्या टप्यातील १०३ कोटींच्या योजनेला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:29 IST

जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्यातील १०३ कोटींच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे...

बारामती: बारामती तालुक्यात जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्यातील १०३ कोटींच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील १२ गावे ५८ वाडया / वस्त्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. यापूर्वी जिरायती भागातील ३३९ कोटी रुपये खर्चाच्या ६० गावांच्या ७ प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आहे.

दोन टप्प्यात एकुण ४४२ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या जिरायती भागासह बागायती भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. बारामती तालुका पुनर्विलोकन व एकात्मिक विकास समन्वय समितीचे अध्यक्ष, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना  बारामती उपविभाग उपअभियंता तन्मय कांबळे यांनी याबाबत माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून १२ गावे ५८ वाडया / वस्त्यांसाठी दुसऱ्या टप्प्यात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने १०३ कोटी रक्कमेच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. योजनांची आखणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमार्फत  करण्यात आलेली होती. या योजनेसाठी पाटबंधारे विभागाकडील जागा साठवण तलाव, जलशुध्दीकरण केंद्र व उंच जलकुंभ यासाठी जागा संपादित करण्यात आली आहे.

तसेच निरा-डावा कालवामधील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणासाठी पाटबंधारे खात्याने रितसर परवाना दिला आहे. तसेच या सर्व योजनांसाठी साठवण तलाव, मुख्य संतुलन पाणी टाकी, जलशुध्दीकरण केंद्र, वितरण व्यवस्था, उंच जलकुंभ, पंपहाऊस इ. बाबी बरोबर सदरचे योजनेसाठी सौर उर्जाद्वारे विज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे योजना विज देयकावरील ग्रामपंचायतीचा खर्च कमी प्रमाणात येणार आहे.

मंजुरी मिळालेल्या योजना आणि निधीनिहाय माहिती पुढीलप्रमाणे- माळेगांव खुर्द पाहुणेवाडी नळपाणी पुरवठा योजना - १७.४० कोटी, होळ - सस्तेवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना- २८.२६ कोटी, गडदरवाडी - खंडोबाचीवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना - ११.९५ कोटी , पिंपळी - कन्हेरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना - १७.९९ कोटी, करंजेपुल - सोरटेवाडी प्रादेशिक नळपाणीद पुरवठा योजना २८.०६ कोटी.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी