भाजपच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक आणि सभागृह नेते धीरज घाटे यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2023 09:21 IST2023-07-19T08:52:28+5:302023-07-19T09:21:11+5:30
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.

भाजपच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक आणि सभागृह नेते धीरज घाटे यांची नियुक्ती
पुणे - पुणे शहर भाजपच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे. भाजपचे जगदीश मुळीक यांची शहराध्यक्ष पदाची तीन वर्षांची मुदत सपली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरात लवकर शहराध्यक्षपदी नवीन व्यक्तीची निवड केली जाईल असे जाहीर केले होते त्यानुसार ही निवड करण्यात आली आहे.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. धीरज घाटे यांनी गेले अनेक वर्ष भाजपचे नगरसेवक म्हणून काम केले आहे पुणे महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या सभागृहनेते पदाची जबाबदारी ही त्यांनी पार पाडले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाल्यानंतर पक्षातील सर्वच पदांवर नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी प्रदेशची कार्यकारिणीही जाहीर झाली.