शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय' साकारण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 12:32 IST

महाविद्यालयाच्या मान्यतेचा अर्ज मुंबईत वैद्यकीय शिक्षक संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे सुपूर्द

ठळक मुद्देमहाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, नाशिककडेही होणार अर्ज दाखल

पुणे : महापालिकेच्या महत्वाकांक्षी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्ष साकारण्याच्यादृष्टीने सकारात्मक पाऊल पडले असून महाविद्यालयाच्या मान्यतेचा अर्ज मुंबईत वैद्यकीय शिक्षक संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, अतिरिक्त आयुक्त (जनरल) रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्यप्रमुख, अंजली साबणे उपस्थित होत्या. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमितजी देशमुख यांच्याकडे हा अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती महापौर मोहोळ यांनी दिली. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, नाशिक यांच्याकडे शुक्रवारी हा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. महाविद्यालयाची प्रक्रिया निर्णयाक स्थितीमध्ये आली आहे.गुजरातमधील अहमदाबाद महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर पुणे महापालिकेचा न्यास (ट्रस्ट) स्थापन करण्यात येणार आहे. या न्यासाच्या माध्यमातून महाविद्यालय उभे करण्याचा ठराव स्थायी समितीसह मुख्य सभेत मंजूर झालेला आहे. राज्य शासनाणेही त्याला मान्यता दिलेली आहे. धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून न्यास नोंदणी करून दोन्ही नोंदीचे पत्र पालिकेला प्राप्त झालेले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा 'मास्टर प्लॅन' तयार करण्यात आला असून त्याला पालिकेच्या बांधकाम विभागाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीआयची मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तत्पूर्वी डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स, नाशिक यांच्याकडून एक पथक पाहणीसाठी पुण्यात येणार आहे. त्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर केंद्राकडे हा प्रकल्प जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीआयची मान्यता झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळणार आहे. ----------स्थायी समितीचा अध्यक्ष असताना पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे ही संकल्पना मांडली होती. भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महाविद्यालय सुरू करण्यात यावे अशी कल्पना आणि दरवर्षी त्याप्रमाणे अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाची १०० जागांच्या प्रवेशाची क्षमता पूर्ण करण्याचे शंभर टक्के प्रयत्न करण्यात येणार आहेत. पुढच्या पाच वर्षांच्या काळामध्ये मान्यता मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने ५०० खाटांचे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, वसतीगृह, प्रयोगशाळेचे बांधकामे टप्प्याटप्प्याने केले जाणार आहेत.- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcollegeमहाविद्यालयMayorमहापौर