शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आयकर सवलतीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 18:00 IST

पुणे :  पुणे कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय सेवातून सेवानिवृत्त झालेले भा.प्र.से., भा.पो.से. आदी तसेच माजी आमदार यांच्यासह ...

पुणे: पुणे कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय सेवातून सेवानिवृत्त झालेले भा.प्र.से., भा.पो.से. आदी तसेच माजी आमदार यांच्यासह सर्व राज्य शासकीय सेवा निवृत्तीधारकांना आयकर सवलतीसाठी गुंतवणूकीची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.

निवृत्तीवेतनधारकांचे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी निवृत्तीवेतनाचे करपात्र उत्पन्न सर्व सवलती वगळता 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आयकराची गणना होते. त्यामुळे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांहून अधिक असल्यास त्यांनी आयकर कायदा 1961 चे कलम 80 सी, 80 सीसीसी, 80 डी, 80 जी नुसार गुंतवणूक, बचत केली असल्यास त्याची कागदपत्रे, सत्यप्रत तसेच पॅनकार्डची सत्यप्रत कोषागार कार्यालय पुणे येथे प्रत्यक्ष किंवा to.pune@zillamhakosh.in या ई-मेल पत्त्यावर मेलद्वारे 20 नोव्हेंबर 2021 अखेर सादर करण्याचे आवाहन केले आहे.

कागदपत्रे विहित मुदतीत सादर न केल्यास अप्पर कोषागार अधिकारी पुणे हे आयकर कायदा कलम 191 नुसार आहरण संवितरण अधिकारी म्हणून सन 2021-22 च्या आयकराची कपात पात्र निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनातून हप्त्यांमध्ये करतील, असे वरिष्ठ कोषागार अधिकाऱ्यांनी कळवले आहे.

टॅग्स :PuneपुणेIncome Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड