इच्छुकाच्या कार्यालयावर अज्ञातांची दगडफेक
By Admin | Updated: January 12, 2017 02:39 IST2017-01-12T02:39:48+5:302017-01-12T02:39:48+5:30
मासूळकर कॉलनी येथील भाजपाच्या प्रभाग क्रमांक नऊमधील एका महिला इच्छुक उमेदवाराच्या कार्यालयावर

इच्छुकाच्या कार्यालयावर अज्ञातांची दगडफेक
नेहरुनगर : मासूळकर कॉलनी येथील भाजपाच्या प्रभाग क्रमांक नऊमधील एका महिला इच्छुक उमेदवाराच्या कार्यालयावर दगडफेक करण्याची घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या माजी प्रदेश सचिव वीणा दत्तानंद सोणवलकर (वय ३२, रा प्रेम आंगण, मासूळकर कॉलनी, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. वीणा सोणवलकर या प्रभाग क्रमांक ९ मधून इच्छुक उमेदवार असून, त्यांचे मासूळकर कॉलनी येथे जनसंपर्क कार्यालय आहे. मंगळवारी पहाटे त्यांच्या कार्यालयावर काही अज्ञात व्यक्तींनी सिमेंटचे ब्लॉक मारून दगडफेक केली. त्यांच्या कार्यालयाच्या दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. या वेळी कार्यालयात काही कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांनी सोनवलकर यांना दगडफेक होत असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांसह त्या कार्यालयाजवळ आल्या. परंतु तत्पूर्वीच आरोपी पळून गेले होते. (प्रतिनिधी)