शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जगताप आत्महत्येप्रकरणी मानकर, कर्नाटकी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 19:40 IST

रेल्वेखाली उडी मारुन जगताप यांनी आत्महत्या केली़ होती. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली़. त्यात दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी आणि फोटोमध्ये असलेल्या सर्व जणांच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केल्याचा उल्लेख आढळला होता. 

ठळक मुद्देमुख्य आरोपी दीपक मानकर व अटक केलेले आरोपी यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात वेगवेगळे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल

पुणे : जमिनीच्या वादातून जितेंद्र जगताप यांनी केलेल्या आत्महत्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे़. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर दीपक मानकर (रा़ नारायण पेठ) आणि बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी, कुख्यात गुंड नाना कुदळे (रा़ केळेवाडी) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. ते दोघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़. मंगळवारी (दि. ५जून )  मानकर, कर्नाटकी यांच्यावतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर व्हावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुूसार, याप्रकरणी जगताप यांचा मुलगा जयेश जगताप (वय २८, रा़ घोरपडे पेठ) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यावरुन मानकर , कर्नाटकी यांच्या त्यांच्या साथीदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात विनोद रमेश भोळे (वय ३४, रा़ जोशी वाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०,रा़ जयभवानी नगर, कोथरुड), अमित उत्तम तनपुरे (वय२८, रा़ मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६, रा़ शांतीनगर, येरवडा) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा़ शांतीनगर येरवडा)यांना अटक केलेली आहेत़ मात्र, नगरसेवक मानकर, कर्नाटक यांच्यासह कुदळे हे फरार आहे. त्यांच्यावतीने हा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी न्यायालयात दाखल करण्यात आला होता. तो न्यायालयाने नाकारला. जगताप यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली़ त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली़. त्यात दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी आणि फोटोमध्ये असलेल्या सर्व जणांच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केल्याचा उल्लेख आढळला होता. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, मुख्य आरोपी दीपक मानकर व अटक केलेले आरोपी यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात वेगवेगळे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़. तसेच मानकर हे राजकीय व्यक्ती असून त्यांची दहशत आहे, अशी गोपनीय माहिती आहे़. त्यामुळे हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळ्ण्याची मागणी करण्यात आली होती. ती न्यायालयाने ग्राह्य धरत हा अर्ज नामंजूर केला. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस