शहरात आणखी पाणीकपात?
By Admin | Updated: July 10, 2014 00:05 IST2014-07-10T00:05:43+5:302014-07-10T00:05:43+5:30
मॉन्सूनने दडी मारल्यामुळे शहरातील पाणीकपातीत आणखी वाढ करावी लागणार आहे.

शहरात आणखी पाणीकपात?
पुणो : मॉन्सूनने दडी मारल्यामुळे शहरातील पाणीकपातीत आणखी वाढ करावी लागणार आहे. त्यादृष्टीने पर्यायी व आपत्कालीन उपाययोजनांचा आराखडा प्रशासनाकडून तयार करण्यात येणार आहे.
महापालिकेला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला धरणाने तळ गाठला आहे. अद्याप पावसाचा पत्ता नाही. त्या पाश्र्वभूमीवर आयुक्त विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेतील पाणीपुरवठा अधिका:यांची आज बैठक झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1क् जुलैर्पयत पाऊस अपेक्षित होता. परंतु, अद्याप धरण क्षेत्रत पुरेसा पाऊस झालेला नाही. येत्या 11 जुलैला जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याबरोबर महापालिका अधिका:यांची बैठक
होणार आहे. त्यादृष्टीने शहरातील पाणीपुरवठय़ाचा आढावा घेण्यात आला. तसेच, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पर्यायी उपाययोजनाचा
आराखडा तयार करण्याविषयीच्या सूचना या वेळी पाणीपुरवठा अधिका:यांना करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
ैहवामान विभागाकडे डोळे
गेल्या आठवडय़ापासून महापालिका, जिल्हाधिकारी आणि पाटंधारे विभागातील अधिकारी हवामान विभागाच्या अधिका:यांशी संपर्कात आहे. हवामान विभागाने अंदाज सांगावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हवामान विभागाकडे दीर्घकालीन अंदाजासाठीच यंत्रणा आहे. अल्पकालीन अंदाजासाठी अद्याप सक्षम यंत्रणा नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. तरीही हवामान विभागाच्या काही अधिका:यांनी 11 जुलैर्पयत पाऊस पडणार असल्याचे सांगितल्याने शुक्रवारी शहरातील पाणीटंचाईवर चर्चा करण्याचे ठरविण्यात आले.
मुळशी धरणाचाही पर्याय
मुळशी तालुक्यातील टाटा कंपनीच्या धरणामध्ये पाणीसाठा आहे. पुण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यास येथून पाणी आणण्याच्या पर्यायाच्या विचाराचीही चर्चा सुरू आहे. पानशेत धरण फुटीनंतर हा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, अद्याप या पर्यायावर शासकीय पातळीवर चर्चा नाही. हे पाणी टाटा कंपनी वीजप्रकल्पासाठी वापरते. ती वीज मुंबईला जाते.