शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Force चा अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात? कुरुलकरांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 16:59 IST

कुरुलकर यांच्या संपर्कात असलेल्या महिलेने बेंगळुरु येथे हवाई दलात कार्यरत असलेल्या एका मराठी अधिकाऱ्यालाही देखील संपर्क केल्याचे समोर

पुणे : ‘डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानातून आलेल्या ई-मेलचा सखोल तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. कुरुलकरांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेरांना संवेदनशील माहिती तसेच छायाचित्रे ई-मेलद्वारे पाठवल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. राज्य दहशतवादविरोधी विभागाच्या (एटीएस) कोठडीत असलेल्या कुरुलकरांची चौकशी सुरू आहे. कुरुलकरांची सखोल चौकशी करायची असल्याने त्यांना १५ मेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामधून इंडियन एअरफोर्सचा आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक माहिती कुरुलकरांच्या चौकशीतून समोर आली आहे. 

कुरुलकर यांच्या संपर्कात असलेल्या महिलेने बेंगळुरु येथे हवाई दलात कार्यरत असलेल्या एका मराठी अधिकाऱ्यालाही संपर्क साधल्याचे समोर आले आहे. त्या महिलेने संबंधित अधिकाऱ्याशी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर संवाद झाला. त्या अधिकाऱ्याचा देखील या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने जबाब नोंदवला आहे. तसेच कुरुलकर यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. 

कुरुलकर यांना पाकिस्तानातून काही ई-मेल पाठवण्यात आले आहेत. या ई-मेलला प्रतिसाददेखील दिलेला आहे. पाकिस्तानातील आयपी ॲड्रेसवर मेल केल्याची माहिती गुगलने दिलेल्या अहवालातून उघड झाली आहे. कुरुलकरांनी देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारे काही छायाचित्रे पाठवल्याचा संशयदेखील तपास यंत्रणेला आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटाॅप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून, याबाबतचा अहवाल एटीएसला मिळाला आहे. २०२२ मध्ये कुरुलकरांनी सहा देशांना भेटी दिल्या आहेत. शासकीय पारपत्राद्वारे कुरुलकरांनी परदेशात जाऊन पाकिस्तानी हेरांच्या भेटी घेतल्याचा संशय एटीएसला आहे. परदेशात कोणाची भेट घेतली याअनुषंगाने चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतPakistanपाकिस्तानForceफोर्सhoneytrapहनीट्रॅप