शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पालिकेच्या सोनावणे प्रसूति रुग्णालयात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 19:30 IST

सोनवणे हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर्स, नर्सेस, आया, नर्सिंग ऑर्डरली व कर्मचारी असे एकूण १७ कर्मचारी क्वारंटाईन...

ठळक मुद्देसोनावणे रुग्णालयातील महिलांची प्रसूती व नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात प्रवेश बंद

पुणे : पालिकेच्या कै. चंदूमामा सोनावणे प्रसूतिगृहामध्ये आणखी एक महिला कोरोना संक्रमित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही महिला दोन दिवसांपूर्वीच प्रसूत झाली असून तिला पुढील उपचारांसाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी याच रुग्णालयात पाच महिन्यांची गरोदर असलेल्या महिलेला कोरोना झाल्याचे समोर आले होते.भवानी पेठेमध्ये पंडित नेहरू रस्त्यावर हे सोनावणे प्रसूतिगृह आहे. आसपासच्या वस्ती विभागासह शहरभरातून महिला उपचारांसाठी आणि प्रसूतिकरिता येथे येत असतात. याठिकाणी उपचारांसाठी पाच महिन्यांची महिला उपचारासाठी दाखल झाली होती. तिला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसत असल्यामुळे डॉक्टर्स व सहकारी यांनी तपासणी केली. या तपासणीमध्ये महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यावर तिला पुढील उपचारांकरिता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर भारती हॉस्पिटलमध्ये व उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर सोनवणे हॉस्पिटलमधील ३ निवासी डॉक्टर्स, ९नर्सेस, १ आया, २ नर्सिंग ऑर्डरली व २ अन्य कर्मचारी अशा एकूण १७ कर्मचाऱ्यांना दक्षता म्हणून विलगीकरण करण्यात आले. त्यानंतर आणखी एक महिला मंगळवारी पॉझिटिव्ह आली. दोन दिवसांपूर्वी प्रसूत झालेल्या महिलेला कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने तिच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.या महिलेला उपचारांसाठी भारती विद्यापीठ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सलग दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने येथील डॉक्टर आणि कर्मचारी मात्र हवालदिल झाले आहेत. -----------सोनावणे रुग्णालयातील महिलांची प्रसूती व नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात प्रवेश बंद करण्यात आले आहेत. रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व अन्य कर्मचारी यांचे साहाय्याने या रुग्णालयातील फक्त बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू ठेवण्यात आली आहे. या रुग्णालयात येणा?्या गर्भवती स्त्री व नवजात बालक यांना तपासणी व उपचाराकरिता मनपाच्या कमला नेहरू रुग्णालयात अथवा येरवडा येथील स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी रुग्णालयात जाण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpregnant womanगर्भवती महिलाhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर