शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शिवम आंदेकरवर आणखी एक गुन्हा दाखल;अनाधिकृत फ्लेक्स लावून वीज चोरी केल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:51 IST

शिवम आंदेकर व त्याच्या साथीदारांवर नुकताच खंडणीचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक केली. त्यानंतर आता त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे : नाना पेठेतील आंदेकर चौकात महापालिकेची परवानगी न घेता "माजी लोकप्रिय नगरसेवक स्वर्गीय उदयकांतजी आंदेकर चौक" असा नामफलक उभा करून त्याला बेकायदेशीरपणे वीज जोड केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी शिवम उदयकांत आंदेकर व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

नानापेठेतील डोके तालीम जवळ १ जानेवारी रोजी एक आठ वर्षांची मुलगी घराजवळ खेळत होती. खेळत असताना येथील "माजी लोकप्रिय नगरसेवक स्वर्गीय उदयकांतजी आंदेकर चौक" नावाच्या फलकाला स्पर्श झाल्यानंतर तिला विजेचा धक्का लागला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. ससुन हॉस्पिटलने शवविच्छेदन करून तिचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचा अहवाल दिला. यानंतर समर्थ पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली होती.

मात्र, अधिक तपासामध्ये पोलिसांना येथील "माजी लोकप्रिय नगरसेवक स्वर्गीय उदयकांतजी आंदेकर चौक" नावाचा लोखंडी नामफलक महापालिकेची परवानगी न घेता शिवम देकर, रा. नानापेठ व त्याच्या साथीदारांनी उभारला. तसेच या फलकाला फूटपाथवरील विजेच्या खांबामधून बेकायदेशीरपणे वीज जोड केल्याचे निष्पन्न झाले. याच ठिकाणी विजेचा धक्का लागून आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तसेच ११ वर्षांचा एक मुलगा जखमी झाल्याने पोलिसांनी शिवम आंदेकर व त्याच्या इतर साथीदारांवर भारतीय विद्युत कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शिवम आंदेकर व त्याच्या साथीदारांवर नुकताच खंडणीचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक केली. त्यानंतर आता त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड