शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

डी. एस. कुलकर्णी यांच्या शहरात आणखी २५ मालमत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 13:40 IST

ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डी़.एस़.कुलकर्णी यांच्या पुणे शहरात आणखी २५ मालमत्ता आढळून आल्या आहेत़.

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेची माहिती : उपजिल्हाधिकाऱ्यांना सादरधायरीसह पिरंगुट, बाणेर, बावधन, बालेवाडी, किरकटवाडी या जागांची किंमत सुमारे २०० ते ३०० कोटी रुपयांपर्यंत असल्याची माहिती

पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या वर्षापासून येरवडा कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डी़.एस़. कुलकर्णी यांच्या शहरात आणखी २५ मालमत्ता आढळून आल्या आहेत़. आर्थिक गुन्हे शाखेकडून घेण्यात आलेल्या सर्चमध्ये या मालमत्ता आढळून आल्या असून त्याच्यावरही जप्तीची कारवाई करण्यासाठी या मालमत्तांची यादी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे़. या जागांची किंमत सुमारे २०० ते ३०० कोटी रुपयांपर्यंत असल्याची माहिती मिळाली आहे़. सक्त वसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयाच्या परवानगीनंतर डीएसके यांची चौकशी केली होती़. कुलकर्णी यांच्या परदेशातही मालमत्ता असल्याचे आढळून आले होते़. त्यावेळी कुलकर्णी यांच्या शहरात आणखी काही मालमत्ता असल्याची माहिती समोर आली होती़.धायरी भागात त्यांच्या १२ मालमत्ता असून पिरंगुट, बाणेर, बावधन, बालेवाडी, किरकटवाडी या भागात त्यांच्या मालमत्ता  असल्याचे तपासात पुढे आले आहे़. आर्थिक गुन्हे शाखेने या नव्याने आढळलेल्या २५ मालमत्तांची यादी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केली आहे़. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, पुतणी सई वांजपे, जावई केदार वांजपे, मुलगा शिरीश कुलकर्णी, कंपनीतील अधिकारी धनंजय पाचपोर, मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक करण्यात आली होती़. डी़एस़के व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी हे सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत़. त्यांच्या विरोधात आतापर्यंत ३३ हजार ठेवीदारांनी तक्रारी दिल्या आहेत़.  त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे़. दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी ठेवीदारांची २ हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे़. डी एस के पतीपत्नीं यांच्याविरुद्ध २८ आॅक्टोंबर २०१७ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़. त्यानंतर त्यांना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्लीहून अटक करण्यात आली होती़. त्यांच्या अडीचशेहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून तसेच २ कोटी रुपयांहून अधिक किंमतीची चारचाकी व दुचाकी वाहने जप्त केली आहेत़. या मालमत्तेंचा तसेच वाहनांचा लिलाव करण्याची परवानगी उपजिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे मागितली आहे़. मात्र, त्यावरील सुनावणी गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे़ .

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक