शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Akshaya Tritiya: श्री महालक्ष्मी देवीला मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 10:36 IST

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्यावतीने आयोजन

पुणे : मोग-यासह सुवासिक फुलांचा श्री महालक्ष्मी देवीला घातलेला पोशाख... श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीचे पुष्पाभिषेक केल्यानंतर दिसणारे विलोभनीय रुप... मंदिराचा गाभारा व सभामंडपातील विविधरंगी पुष्पांची आरास पाहण्याकरीता देवीभक्तींनी गर्दी केली. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मोग-याच्या हजारो फुलांचा सुगंध दरवळत होता. यावेळी आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला. निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षयतृतीयेच्या निमित्ताने वासंतिक मोगरा व आंबा महोत्सवाचे. मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला होता. तब्बल १५१ किलो मोगरा, २५१ गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, झेंडू यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. तसेच मंदिरात आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला. तब्बल २ हजार आंब्याचा महानैवेद्य देवीला दाखविण्यात आला होता. श्री महालक्ष्मी देवीसह श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीसमोर आंब्याचा महानैवेद्य दाखविण्यात आला. फुलांची आरास आणि आंबा महोत्सव पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. सामाजिक संस्थांना आंबे प्रसाद म्हणून देणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.  

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाTempleमंदिरSocialसामाजिकMangoआंबाFlowerफुलं