शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बँक आॅफ महाराष्ट्रच्या ४ संचालकांची वार्षिक सर्वसाधारण सभेला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 18:58 IST

डीएसके आर्थिक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर गुरूवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी व्यवस्थापनाला जाब विचारला

ठळक मुद्देभागधारकांकडून नाराजी : संचालकांच्या अटकेवरुन व्यवस्थापनाला विचारला जाबवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अटकेनंतरही विशेष काही झाले नसल्याचा व्यवस्थापकांचा अविर्भाव

पुणे : बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना डीएसके आर्थिक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर गुरूवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी व्यवस्थापनाला जाब विचारला. या सभेला बँकेच्या चार संचालकांनी दांडी मारल्यामुळे भागधारकांनी नाराजीही व्यक्त केली. आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बॅँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मराठे यांच्यासह बँक आॅफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनहोत (जयपूर), विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे (अहमदाबाद) या अधिकाऱ्यांना बुधवारी अटक केली. त्याचे पडसाद बँकेच्या गुुरुवारी (दि. २१) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पडले. सभेच्या सुरुवातीलाच बँक व्यवस्थापनाने याप्रकरणी निवेदन दिले. तसेच काही सभासदांनी मराठे यांच्या अटकेविषयी सहानुभुती व्यक्त केली. बँकेच्या आठ संचालकांपैकी मराठे आणि गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारच्या सभेत बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि अर्धवेळ अकार्यकारी संचालक सीए दीनदयाळ अग्रवाल उपस्थित होते. मात्र, रिझर्व्ह  बँक आॅफ इंडियाचे प्रतिनिधी जी. श्रीकुमार, सरकार नियुक्त संचालक वंदिता कौल, भागधारकांचे संचालक आर. थामोधरन आणि अर्धवेळ अकार्यकारी संचालक अर्चना ढोलकिया यांनी मात्र सभेला दांडी मारली. बुधवारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर सर्व संचालकांनी सभेला हजेरी लावून भूमिका मांडणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी सभेकडे पाठ फिरविली. त्यामुळे भागधारकांमध्ये नाराजी होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अटकेनंतरही विशेष काही झाले नसल्याचा व्यवस्थापकांचा अविर्भाव होता. यापुर्वी मुनहोत यांच्या प्रकरणातही व्यवस्थापनाची अशीच भूमिका होती, असे बँकेचे भागधारक विवेक वेलणकर यांनी सांगितले. मराठे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याची भूमिका काही जणांनी मांडल्याचेही वेलणकर म्हणाले. बँकेत होणाऱ्या विविध घोटाळ्यानंतरही व्यवस्थापन कोणताही धडा घेण्यास तयार नाहीत. मराठे यांच्या नियुक्तीनंतर तुम्ही सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारखी भूमिका घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगितले होते. मात्र, त्यांनी काही केले नाही. त्यांच्या चुकीच्या कृतीमुळेच अटकेची कारवाई झाली. व्यवस्थापनाने कारभारात संपूर्ण पारदर्शकता ठेवायला हवी, असे भागधारक सुहास वैद्य म्हणाले.   

टॅग्स :PuneपुणेbankबँकD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीArrestअटकPoliceपोलिसCrimeगुन्हा