शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! ...म्हणून जोडप्याने दोन महिन्यांच्या बाळाला रस्त्यावर सोडून दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 15:36 IST

पुण्यातील खडकीमधील भयंकर घटना

पुणेः मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या मंगळवारी सोनाली अडागळे यांना खडकीतील मेथॉडिस्ट चर्चच्या रस्त्याच्या कडेला दोन महिन्यांचे एक बाळ सापडले. त्यांनी या बाळाची माहिती खडकी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडले. अखेर पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश आले. या जोडप्याने एकत्र राहण्यासाठी हे बाळ फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दोन महिन्यांच्या बाळाला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या आई वडिलांविरोधात खडकी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाचे वडील हे इंजिनियर असून खासगी कंपनीमध्ये काम करतात. त्यांच्यात आणि पत्नीत काही कौटुंबिक पातळीवर वाद सुरु होता. तसेच त्यांचा  आपल्या पत्नीवर संशय देखील होता. या कारणावरून दोघांमध्ये सातत्याने भांडण होत असत. बाळ आपले नसल्याचेही पती म्हणत असत. त्यामुळे टोकाचे भांडण होत असल्याने या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. व दोघेही स्वतंत्र राहू लागले. पण काही कालांतराने त्यांनी पुन्हा एकत्र राहायला सुरुवात केली.पण यावेळी वडिलांनी माझ्यासोबत राहायचे असल्यास बाळाचा त्याग करावा लागेल असे पत्नीला बजावले. यानंतर या आईवडिलांनी बाळाला चर्च जवळ रस्त्याच्या कडेला सोडून दिले होते. 

    खडकीतील मेथॉडिस्ट चर्चजवळ बाळ सापडल्यानंतर खडकी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्याच्या आईवडिलांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली होती. सोशल मीडियावर हा शोध सुरु असतानाच सामाजिक कार्यकर्ते निलेश दास यांना व्हॉट्स अँपवर या बालकाचा फोटो ठेवून 'मिस यू' असे लिहिल्याचे आढळले. दास यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क केल्यावर हे बाळ त्यांच्या बहिणीचे असल्याचे समजले. पण दास यांना खरा धक्का तेव्हा बसला ज्यावेळी या व्यक्तीने बाळाचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याचे सांगितले. परंतु, दास यांनी बाळ जिवंत असल्याचे सांगत त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती दिली. ज्यावेळी संबंधित व्यक्तीने ससून रुग्णालयात जात बाळ जिवंत आहे का नाही याची खात्री केली. मात्र त्यानंतर ह्या सर्व प्रकरणाचा उलगडा पोलिसांना झाला. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस