शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! पुण्यात नराधम सावत्र बापानेच ३ वर्षाच्या मुलीचे डोके भिंतीला आपटून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 15:57 IST

तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीला सलग तीन दिवस मारहाण करत भिंतीवर डोके आपटून खून करण्यात आल्याची धक्का दायक घटना

पुणे : अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीला सलग तीन दिवस मारहाण करत भिंतीवर डोके आपटून खून करण्यात आल्याची धक्का दायक घटना आंबेगाव बुद्रुक येथे श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी एका २४ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली असून त्या नूसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मुलीच्या सावत्र बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र उत्तम पाटील (वय ३३ वर्षे) यास अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पाटील हा एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहिती नूसार फिर्यादी महिलेचा जितेंद्र याच्याबरोबर चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. विवाह करताना ती घटस्फोटीत असून तीला तीन वर्षाची मुलगी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र महिनाभरापुर्वीच जितेंद्रला आपली पत्नी घटस्फोटीत नसून तीची मुलगी अनैतीक संबंधातून जन्माला आल्याचे समजले. या मुळे तो सातत्याने चिडचिड आणि मुलीचा राग करत होता. 

त्याने १३ एप्रिल रोजी रात्री मुलीला आईसमोर हाताने मार हाण करुन पाय धरुन उलटे करत फिरवली होती. तसेच डोके भिंतीला आदळून तीला जखमी केले होते. यानंतर पुन्हा १५ एप्रिल रोजी मुलगी झोपली असता तीच्या गालाला थापडी मारुन तीचे पाय पकडून तीला कॉटवरुन खाली ओढले. यानंतर तीला डोक्‍याच्या दिशेने भिंतीवर आपटून जीवे ठार मारले. मुलगी निपचीत पडल्यावर आईने धावाधाव करत तीला रुग्णलयात नेले. 

मात्र तेथे डॉक्‍टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. डॉक्‍टरांनी याची खबर पोलिसांनी दिली. शवविच्छेदन अहवालात मुलीला मारहाण केल्याचे निष्पन्न झाले.फिर्यादी महिलेचे पुण्यात कोणीच नातेवाईक नाहीत. यामुळे मुलीला पती मारहाण करत असल्याने ती घाबरुण गेली होती. यानंतर पोलिसांनी तीला विश्‍वासात घेतल्यावर खरी घटना उघडकीस आली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आशीष कवठेकर करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिसArrestअटकmarriageलग्न