शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर-लोहगाव विमानतळाबाबत लवकरच घोषणा : आदित्य ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 19:33 IST

गुंतवणुकीसाठी पुणे योग्य शहर

ठळक मुद्दे दोन दिवसीय ‘इंटरनॅशनल बिझनेस समीट’चे आयोजन २० देशांचे कौन्सिल जनरल, व्यापार आयुक्त आणि उद्योगपती यात सहभागी

पुणे : शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोहगाव आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळांबाबत लवकरच सकारात्मक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी (दि. २) दिली. राज्यामधे गुंतवणूक करण्यास पुणे योग्य शहर असल्याचा अभिप्रायही त्यांनी नोंदवला. पुण्यातील गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर’च्या वतीने (एमसीसीआए) दोन दिवसीय ‘इंटरनॅशनल बिझनेस समीट’चे आयोजन करण्यात आले आहे, त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, महासंचालक प्रशांत गिरबाने या वेळी उपस्थित होते. इटली, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, मलेशिया आणि जर्मनीसह सुमारे २० देशांचे कौन्सिल जनरल, व्यापार आयुक्त आणि शहरातील उद्योगपती यात सहभागी झाले होते. ठाकरे म्हणाले, ‘‘शिक्षण, उद्योग, कृषी, संशोधनासह सर्व क्षेत्रांत राज्य आघाडीवर आहे. इंटरनेटचे जाळे राज्यभर पसरले आहे. त्यामुळे महाराष्ट्र गुंतवणूक करण्यासाठी सर्वार्थाने योग्य राज्य आहे. राज्यात गुंतवणूक करणाºयांचे आम्ही स्वागत करू.’’ त्यातही गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी पुणे अत्यंत योग्य ठिकाण असल्याचे ठाकरे म्हणाले. शाश्वत शेतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर औद्योगिक क्षेत्राने भर द्यावा. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई देण्याचा निर्णय विधानसभेतील चर्चेनंतर होईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.  ‘उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक सर्व बाबी पुण्यात उपलब्ध आहेत. शिक्षण, संशोधन, आरोग्य आणि सेवा क्षेत्रात पुणे आघाडीवर असल्याचे भार्गव म्हणाले. सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे अध्यक्ष पी. सी. नांबियार, विकफिल्ड प्रॉडक्ट एलएलपी’चे व्यवस्थापकीय संचालक मुकेश मल्होत्रा, ‘प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड’चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, ‘पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे आणि ‘प्रवीण मसालेवाले’चे संचालक आनंद चोरडिया यांनी त्यांच्या उद्योगाचा प्रवास उलगडला. गिरबाने यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळAaditya Thackerayआदित्य ठाकरेbusinessव्यवसाय