साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:08 IST2021-07-15T04:08:48+5:302021-07-15T04:08:48+5:30

यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करा बारामती : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर ...

Announce Bharat Ratna Award to Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करा

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करा

यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करा

बारामती : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करा, अशी मागणी येथील साधू बल्लाळ यांनी केली आहे. याबाबत बल्लाळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती येथे गोविंद बाग येथे भेट घेत मागणी केली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजातील उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणांना बिगर व्याजी कर्जपुरवठा करण्यात यावा. त्या बाबतीत आघाडी सरकारने तरतूद करावी, अशीही शरद पवार यांच्याकडे यांनी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळासाठी शंभर कोटी पॅकेज जाहीर केले आहे. परंतु मातंग समाजातील अनेक तरुण युवक एमपीएससी, आयपीसीपर्यंत शिक्षण घेणे कामे त्यांना पैशाची कमतरता पडत असते. त्या पार्श्वभूमीवर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून या मुलांना एमपीएससी, आयपीसी शिक्षणासाठी देखील शासनाने मदत करावी, अशी ही मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात आल्याचे बल्लाळ म्हणाले.

Web Title: Announce Bharat Ratna Award to Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe