बाजारभाव नसल्याने कोबी, फ्लॉवर पिकात सोडली जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST2021-02-05T05:07:09+5:302021-02-05T05:07:09+5:30
आंबेगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कोबी व फ्लाॅवर ही पिके घेतो. कोबी पिक साधारणता ६० ते ७० दिवसात येते. ...

बाजारभाव नसल्याने कोबी, फ्लॉवर पिकात सोडली जनावरे
आंबेगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कोबी व फ्लाॅवर ही पिके घेतो. कोबी पिक साधारणता ६० ते ७० दिवसात येते. या पिकाला एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. मात्र दोन्ही पिकांचे बाजारभाव मागील आठ दिवसांपासून ढासळले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोबी दहा किलोस एक नंबर २० ते ३० रुपये दोन नंबर १० ते १५ रुपये या भावाने विकला जातोय. तर फ्लावर एक नंबर ८० ते १०० रुपये तर दोन नंबर फ्लॉवर ४० ते ६० रुपये दहा किलो या भावाने विकला जातो. फ्लाॅवर व कोबी या पिकांना बाजारभाव नसल्यामुळे अक्षरश त्यामध्ये मेंढ्या व जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. किरकोळ बाजारात फ्लॉवरला एक रुपया किलो असा बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मजुरी खर्च फिटत नाही.
३० मंचर