शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पुणेकर प्राणीमित्रानं मन जिंकलं; स्वतःच्या कलाकृती विकून रस्त्यावरच्या मुक्या प्राण्यांना जगवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 13:11 IST

घराच्या गेटपासून ते अगदी बेडरुम,हॉल, स्वयंपाकघर असं कुठेही पाहिले तरी तिथे मुक्त संचार करताना श्वान पाहायला मिळतील.

ठळक मुद्देअभिनव कलाकृतीतून १९ पेटंट नावावर : गेली तीस वर्ष संशोधनाच्या क्षेत्रात काम

दीपक कुलकर्णी- पुणे : कोरोनामुळे माणसाला माणूस विचारेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुक्या प्राण्यांची अवस्था सध्याच्या काळात किती भयानक असेल याची कल्पना न केलेली बरी. गेल्या काही दिवसांत महागडी श्वान, मांजरे यांना कोरोनाच्या भीतीमुळे एकतर रस्त्यावर तरी सोडले जात आहे किंवा विषारी ओषधे देत त्यांचे जीवन संपविण्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मात्र, एकीकडे ही परिस्थिती असली तरी दुसरीकडे याच रस्त्यावरच्या मुक्याजीवांसाठी स्वतःच आयुष्य पणाला लावत त्यांची काळजी घेणारे पण कुणीतरी असणारच ना.. हो आहेत.. त्यांनी  रस्त्यावरच्या भटक्या श्वानांसाठी अन्नपाणी, निवारा, औषधोपचार खर्चाच्या व्यवस्थेसाठी आपल्या एकापेक्षा एक सरस कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. पुण्यातील कॅम्प परिसरात राहणाऱ्या निनाद गिडवाणी नावाच्या संशोधक 'प्राणीमित्र' माणसाची ही कथा...

गेल्या ३० वर्षांपासून निसर्ग, पर्यावरण आणि मानवी जीवनशैली यांची सांगड घालण्यासाठी गिडवानी हे नानाविध अभिनव प्रयोग करत आहे. याच विलक्षण प्रयोगातून जागतिक व राष्ट्रीय पातळीवरचे असे एकूण १९ पेटंट त्यांच्या नावावर जमा आहे. त्यांच्या या पेंटटमध्ये पाठीच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेत तयार केलेली लाकडी खुर्ची, नैसर्गिक घटकांचा वापर करुन इंधनाची पुरेपूर बचत करणारी स्वयंपाकाची शेगडी, वेगवेगळी स्वयंपाकाची भांडी, वषार्नुवर्षे टिकणारे दिवे अशा गोष्टींचा समावेश आहे. तसेच गिडवाणी यांच्या भन्नाट कल्पनेतून साकारलेल्या एकापेक्षा एक सरस पेटिंग्स् ,मूर्त्या साकारल्या आहेत. त्यांच्या या अभ्यासपूर्ण संशोधन कायार्साठी भारत सरकारतर्फे  त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

कोणत्याही प्रकारच्या देणगीशिवाय निनाद गिडवानी हे आपल्या पत्नीसह 'भारत प्राणी सेवा केंद्र' या संस्थेमार्फत मुक्या प्राण्यांची सेवा करत आहे. त्यांनी रस्त्यावरच्या निराधार, अपघातग्रस्त, दुर्धर आजार जडलेल्या अशा ५० ते ५५ श्वानांना आपल्या कुटुंबात सामावून घेतले आहे. त्यांच्या घराच्या गेटपासून ते अगदी बेडरुम,हॉल, स्वयंपाकघर असं कुठेही पाहिले तरी तिथे मुक्त संचार करत श्वान पाहायला मिळतील. फक्त ते श्वानांच्या वयानुसार, वेगवेगळ्या प्रजातीनुसार त्यांची राहण्याची, अन्नपाण्याची,उपचाराची काळजी घेतात.

निनाद गिडवाणी म्हणाले, आयुष्यात ज्यावेळी गमावण्यासाठीच माझ्याकडे काहीच राहिले नव्हते. तेव्हा निसर्गाने मला जगण्यासाठीचा सर्वात महत्वाचा घटक असलेला प्राणवायू मोफत दिला. त्याच ऋणात राहून माणूस म्हणून जगताना निसर्ग, पर्यावरण आणि मानवी साखळी जपण्याचा प्रयत्न करतो आहे. इतके दिवस माझ्या कलाकृतींनी मला भरभरुन साथ दिली. त्यामुळे कुणाच्या मदतीशिवाय हे प्राणी सेवाकार्य सुरु होते.

पण कोरोनामुळे माझ्या कलाकृतींना खरेदी करण्यासाठी गिऱ्हाईकच मिळेनासे झाल्यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. रोजचा खर्च तर थांबत नाही. त्यात मुक्या प्राण्यांचे उपचार अतिशय महाग आहेत. तरी जे शक्य असते ते मी घरी करतो. पण अत्यावश्यक उपचारात दिरंगाई करता येत नाही. मात्र, ''राहो में रुकावटे, मुश्किले जरुर आयेगी मगर अच्छे कर्मो से डर नही दुआ मिलती है'' हे वाक्य बोलताना देखील समोरच्या श्वानांवरुन हात फिरवताना ते थोडेसे गहिवरले........................कोरोनामुळे खर्च भागवणे झाले बिकटकोरोनामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक संकट उभे राहिल्याने अनपेक्षित उलथापालथ झाली. आमच्या संस्थेला देखील महिन्याला अन्नपाणी, आरोग्य उपचार यांसह  लागणारा ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च आहे. शिवाय संस्थेत प्राण्यांच्या निगा राखण्यासाठी असलेले कामगार, तसेच कलाकृती घडविण्याच्या कामात मदतनीस म्हणून असणारे कारागीर असे अनेकजण येथे काम करतात, त्यांचे महिन्याचे वेतन आहेच. पूर्वी मुंबई, पुणे आदी ठिकाणी कलाकृतींच्या विक्रीच्या माध्यमातून तो खर्च निघत असत. पण आता सगळेच व्यवहार ठप्प असल्याने ऑनलाईन माध्यमांसह विविध पयार्यांचा विचार सुरु आहे.- निनाद गिडवाणी,भारत प्राणी सेवा केंद्र.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdogकुत्राsocial workerसमाजसेवकartकला