राग मनात धरून एकास कुऱ्हाडीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:09 IST2021-03-24T04:09:56+5:302021-03-24T04:09:56+5:30

सुनीत सुनील ओव्हाळ (वय ३३, रा. भोसे, ता. खेड) असे या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी ...

Anger strikes one with an ax | राग मनात धरून एकास कुऱ्हाडीने मारहाण

राग मनात धरून एकास कुऱ्हाडीने मारहाण

सुनीत सुनील ओव्हाळ (वय ३३, रा. भोसे, ता. खेड) असे या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात संजय भागुजी ओव्हाळ (वय ५६, रा. भोसे) याला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी सुनीत ओव्हाळ शनिवारी दुपारी एकच्या सुमारास गावातील समाजमंदिराच्या समोर उभे असताना संजय ओव्हाळ मोठ्या आवाजात शिवीगाळ करीत होते. फिर्यादी सुनीत त्यांनी संजय ओव्हाळ यांना शिवीगाळ करू नका, असे म्हणाले,त्यानंतर सुनीत चालत घरी जात असताना आरोपी संजय कुऱ्हाड घेऊन आला आणि सुनीत याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा जबरदस्त प्रहार करून गंभीर दुखापत केली असल्याचे चाकण पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या बाबत चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Anger strikes one with an ax