बारामतीत शिवप्रेमींचा संताप; जोडे मारो आंदोलन, कोश्यारींच्या राजिनाम्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 17:35 IST2022-11-22T17:35:07+5:302022-11-22T17:35:16+5:30
बारामती येथील भिगवण चौकामध्ये मंगळवारी मोर्चा काढत कोश्यारी व त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारत संताप व्यक्त केला

बारामतीत शिवप्रेमींचा संताप; जोडे मारो आंदोलन, कोश्यारींच्या राजिनाम्याची मागणी
बारामती : महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वकत्व्य केल्याच्या निषेधार्थ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भापज प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांच्या फोटोला जोडे मारत शिवप्रेमींनी मंगळवारी (दि. २२) आंदोलन केले. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
तत्पूर्वी शिवप्रेमींच्या वतीने बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुनिल महाडीक यांना निवेदन देण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या अवमानकारक वत्कव्याबद्दल शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बारामती येथील भिगवण चौकामध्ये मंगळवारी मोर्चा काढत कोश्यारी व त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारत संताप व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक सत्यव्रत काळे म्हणाले, छत्रपती शिवराय ही आमची अस्मिता आहे. शिवरायांनी अन्याय व जुलमी राजवटीविरोधात लढलेला लढा जगाला दर्शवत आहे. ते येणाऱ्या अनेक पिढ्यांना आदर्शवत राहतील. मात्र कोषारी व त्रिवेदी सारखी माणसे जाणिवपूर्वक छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधाने करत आहेत. शिवरायांचा अवमान आम्ही कदापी सहन करणार नाही. यावेळी शिवप्रेमींच्या वतीने कोषारी हटाव महाराष्ट्र बचाव अशा घोषणा देण्यात आल्या.