शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यात विषारी औषध टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 22:38 IST

पुणे जिल्ह्यातील  मावळ तालुक्यातील अनसुटे येथे अंगणवाडीतील विद्यार्थ्याच्या जेवणात पिकावर मारण्याचे विषारी औषध टाकून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार घडला.

पुणे - पुणे जिल्ह्यातील  मावळ तालुक्यातील अनसुटे येथे अंगणवाडीतील विद्यार्थ्याच्या जेवणात पिकावर मारण्याचे विषारी औषध टाकून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या प्रसंगावधानाने या चिमुरड्याचा जीव वाचला. ही घटना शुक्रवारी  घडली. नेहमीप्रमाणे दुपारी एकला अंगणवाडीसेविका हिरा लष्करे व मदतनीस शोभा गायकवाड यांनी मुलांना मध्यान्ह भोजनासाठी वर्गात बसून मसालेभात दिला होता. मुलांनी भात खाण्यास सुरुवात केली होती. त्याच सुमारास सहादू धोंडिबा टेमगिरे हा त्याच्या लहान मुलीला घेऊन वर्गात आला. माझ्या मुलीलाही मसालेभात द्या, असे सांगितले. त्यानुसार मदतनीस गायकवाड यांनी त्या मुलीलाही मसालेभात खायला दिला. ही मुलगी भात खात असताना टेमगिरे यांनी तिला पाणी प्यायचे आहे, असे सांगून वर्गातील सार्थक चिंतामण मोरमारे (वय ४) याच्यापुढील पाण्याची बाटली घेतली. त्याच वेळी वर्गात गॅसगळतीसारखा उग्र वास येत असल्याचे अंगणवाडीसेविका व मदतनीस यांना जाणवले. त्यांनी गॅस सिलिंडर तपासला. मात्र, वास गॅसचा नसून पिकांवर मारण्यासाठी वापरण्यात येणाºया विषारी औषधाचा असल्याचे जाणवल्याने त्यांनी प्रथम सार्थकसह सर्वांचे डबे तपासले. सार्थकच्या डब्यातील मसालेभात काळा पडला होता. ‘सार्थक, तुझ्या डब्यात हे कोणी टाकले,’ असे अंगणवाडीताईंनी विचारले असता, त्याने टेमगिरेकडे बोट दाखवले. याबाबत त्याला विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. टेमगिरेनेच सार्थकच्या डब्यात औषध टाकल्याचे लक्षात येताच अंगणवाडी कर्मचाºयांनी गावकºयांना बोलावले. गावकºयांनी जाब विचारताच उडवाउडवीची उत्तरे देत त्याने तेथून धूम ठोकली. या घटनेची तक्रार अंगणवाडीसेविका हिरा लष्करे यांनी वडगाव मावळ पोलिसांत दिली. त्यानुसार चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेमगिरेवर गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे